Thursday, May 7, 2026
Homeआपला जिल्हाआजपासून ख्रिच्चन धर्मीयासाठी "चंद्रपूर हार्वेस्ट फेस्टिव्हल 2026” चंद्रपुरात.

आजपासून ख्रिच्चन धर्मीयासाठी “चंद्रपूर हार्वेस्ट फेस्टिव्हल 2026” चंद्रपुरात.

 

चंद्रपूर ( मुक्तिवाद सेवा  : चंद्रपूर शहरात धार्मिक व सांस्कृतिक वातावरणाला उभारी देणारा भव्य कार्यक्रम लवकरच पार पडणार आहे. “चंद्रपूर हार्वेस्ट फेस्टिव्हल 2026” या नावाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाची शहरात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. या फेस्टिव्हलचे आयोजन येत्या १, २ आणि ३ मे २०२६ रोजी करण्यात आले असून, दररोज सायंकाळी ६ वाजल्यापासून कार्यक्रमांना सुरुवात होणार आहे. हा कार्यक्रम सेंट मायकेल स्कूल ग्राउंड, रामनगर, चंद्रपूर येथे आयोजित करण्यात आला आहे.

या तीन दिवसीय कार्यक्रमात स्तुती आराधना, प्रभावशाली वचन आणि विशेष प्रार्थना अशा विविध धार्मिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून रेव्ह. डॉ. किरण यहेकेल आणि भाई शेल्डन बोंगेरा सहभागी होणार असून, त्यांच्या मार्गदर्शनातून उपस्थितांना आध्यात्मिक प्रेरणा मिळणार आहे. या फेस्टिव्हलला चंद्रपूरमधील विविध चर्चेसचा सहकार्य लाभला आहे. शहरातील अनेक धर्मगुरू व श्रद्धाळू मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कार्यक्रमाबाबत अधिक माहितीसाठी आयोजकांनी संपर्क क्रमांक ९८२२५६७०११ आणि ९८२३४२४१७४ उपलब्ध करून दिले आहेत.

एकूणच, “चंद्रपूर हार्वेस्ट फेस्टिव्हल 2026” हा कार्यक्रम शहरातील श्रद्धाळूंसाठी आध्यात्मिक ऊर्जा आणि एकात्मतेचा संदेश देणारा ठरणार आहे अशी माहिती आयोजन सचिव पुरुषोत्तम बेडके, अध्यक्ष प्रशांत साठे, प्रतीक परागे, राजू कन्नूरी, वक्ता विजय नळे, किरण येजकेल यांनी पत्रकार परिषदेत दिली.

Jaypal Gedam

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

error: Content is protected !!