Thursday, May 7, 2026
Homeआपला जिल्हाचंद्रपुरातील चार कर्तबगार पोलिसांचा उद्या होणार गौरव.

चंद्रपुरातील चार कर्तबगार पोलिसांचा उद्या होणार गौरव.

 

चंद्रपूर  ( मुक्तिवाद सेवा ) : महाराष्ट्र पोलीस दलात बजावलेल्या अत्यंत उत्कृष्ट, उल्लेखनीय सेवेबद्दल दिला जाणारा सन २०२६ चा मानाचा आणि प्रतिष्ठेचा ‘पोलीस महासंचालक सन्मान चिन्ह’ (DG Insignia) पदक चंद्रपूर पोलीस दलातील चार कर्तव्यदक्ष अधिकारी व अंमलदारांना जाहीर झाला आहे. त्यांच्या या अतुलनीय कामगिरीमुळे चंद्रपूर पोलीस दलाची मान संपूर्ण राज्यात अभिमानाने उंचावली आहे. गौरवमूर्ती अधिकारी व अंमलदार: या सन्मानचिन्हाने गौरवण्यात आलेल्या पोलीस अधिकारी व अंमलदार


शिवाजी भिमराव कदम पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन गडचांदूर ,

सुनील माधवराव गौरकार पोलीस उपनिरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर ,

विलास झिटुजी निकोडे पोलीस उपनिरीक्षक, पोलीस स्टेशन चंद्रपूर शहर


संदिप कृष्णाजी उपरे पोलीस हवालदार ब.नं. ८२०, पोलीस मुख्यालय, चंद्रपूर

कर्तव्याचा यथोचित गौरव :
सदर पुरस्कार हे संबंधित अधिकारी व अंमलदारांनी त्यांच्या कार्यकाळात दाखवलेले अतुलनीय साहस, कर्तव्यपरायणता आणि गुन्हे तपासातील नैपुण्य याची दखल घेऊन जाहीर करण्यात आले आहेत. त्यांच्या या गौरवपूर्ण कामगिरीबद्दल चंद्रपूर पोलीस दलाच्या वतीने त्यांचे विशेष अभिनंदन करण्यात येत असुन दिनांक 1 मे, 2026 रोजी त्यांना गौरव सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात येत आहे. अशा निष्ठावान अधिकारी आणि अंमलदारांमुळेच पोलीस दलाची विश्वासार्हता जनमानसात टिकून आहे. त्यांच्या या कामगिरीचा चंद्रपूर पोलीस दलास सार्थ अभिमान आहे.

Jaypal Gedam

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

error: Content is protected !!