Thursday, May 7, 2026
Homeआपला जिल्हाराजोली उपक्षेत्रातील त्या वाघिणीचा मृत्यू म्हणजे वन विभागासाठी लाजीरवाणी बाब.

राजोली उपक्षेत्रातील त्या वाघिणीचा मृत्यू म्हणजे वन विभागासाठी लाजीरवाणी बाब.

आतातरी त्या वनपालावर कार्यवाही होणार का  – नागरिक.

चंद्रपूर ( मुक्तिवाद सेवा ) :  चंद्रपूर वन विभाग चंद्रपूर अंतर्गत येत असलेल्या सावली वनपरिक्षेत्राच्या राजोली उपक्षेत्रात दिनांक ३०/४/२०२६ रोजी काही कर्मचारी गस्त घालत असताना अचानक एक वाघिणी मृत अवस्थेत आढळते. आणि कुंभकर्णी गाढ झोपेत असलेले राजोलि उपक्षेत्राचे वनपाल खडबडून जागे होतात.  ही अत्यंत लाजिरवाणी आणि शरमेची बाब आहे.

प्राप्त झालेल्या  विश्वसनीय माहितीनुसार राजोली येथील उपक्षेत्र सहाय्यक कर्तव्यात कामचुकार , खोटे  बोलणारे आणि शासनाचा मोठ्या प्रमाणात पगार घेऊनही शासनाशीच गद्दारी करून सरकारी वनसंपत्ती अवैधरित्या विकून लाखो रुपयाची माया जमविण्यात धुरंदर अशी त्यांची वनविभागात ओळख आहे. मात्र सरकारचे काम न करता उलट सरकारी संपत्ती विकायची याकडेच अधिक लक्ष देण्यात पारंगत असलेले ते वनपाल अगदी बिनधास्त असतात. तर दुसरीकडे वनपरिक्षेत्र अधिकारी आपल्या कर्तव्याची जाण ठेवून काही कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन आपल्या कर्तव्यात कसूर होऊ नये . यासाठी दिवस – रात्र एक करून झटत असतात . नागरिकांच्या येणाऱ्या तक्रारी तसेच  अडी – अडचणी दूर करून समाधान करतात. इतकेच नव्हे तर योग्य मार्गदर्शनही करतात. म्हणूनच सदर वनपरिक्षेत्रातील नागरिक समाधानी आहेत.  परंतु राजोलीचे वनपाल म्हणजे त्याच नागरिकांसाठी डोकेदुखी ठरल्याने वेळोवेळी मनस्ताप आणि नाराजी याकरिता यापूर्वीसुद्धा मुक्तिवादने सदर वनपालाची पोलखोल केली होती. मात्र आजपर्यंत त्या वनपालावर कोणतीच कार्यवाही झाली नाही. हे अत्यंत गंभीर बाब आहे.

सांगायचे तात्पर्य म्हणजे मागील एक ते दीड महिन्या आधी त्या वाघिणीचा मृत्यू झाला असावा. असा अंदाज प्राप्त झालेल्या छायाचित्रावरून लागते. याचाच अर्थ सदरचे राजोलीचे वनपाल जंगलात कधी गस्तच केली नाही.  तर ते फक्त काही लोकांना जंगलाची जागा स्केअर फुट प्रमाणे विकण्यातच व्यस्त होते. असे समजण्यास काही हरकत नाही. असा प्रश्न आता नागरिक करू लागले आहेत. म्हणजेच पगार शासनाचा घ्यायचा आणि काम मात्र आपल्या फायद्याचे करायचे. आणि आपला कार्यकाळ संपल्यावरही पुन्हा एका वर्षासाठी वनविभागाला मुदतवाढ मागायची. हे नेमकं वन विभागात चाललंय तरी काय ? असाही सवाल नागरिक करीत असून त्या वनपालावर तात्काळ निलंबनाची कार्यवाही करून एका कर्तव्यदश  कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी अशी एकमुख मागणी होत आहे.

Jaypal Gedam

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

error: Content is protected !!