Thursday, May 7, 2026
Homeआपला जिल्हाबुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने मचाण गणना यशस्वी.

बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने मचाण गणना यशस्वी.

 

चंद्रपूर ( मुक्तिवाद सेवा ) : बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने जलाशयांवरील मचाण गणनेत निसर्गप्रेमी मंत्रमुग्ध झाले. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात दिनांक १ मे २०२६ रोजी बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने जलाशयांवरील वार्षिक मचाण गणना यशस्स्रीरित्या पार पडली. उन्हाळ्याच्या तीव्र कालावधीत वन्द्मप्राणी पाणवठ्यांभोवती एकत्र येतात, त्यावेळी त्यांच्या उपस्थितीचे मूल्यांकन करण्यासाठी ही महत्त्वपूर्ण मोहीम राबविण्यात आली. ही गणना कोअर व बफर अशा दोन्ही क्षेत्रांमध्ये पार पडली असून वनविभागाच्या कर्मचार्यांसोबत नागरिकांचाही उत्स्फूर्त सहभाग होता. कोअर क्षेत्रात एकूण ९९ मचाण उभारण्यात आले होते. आणि २०१ वनकर्मचारी निरीक्षणासाठी तैनात होते. बफर क्षेत्रात ६९ मचाण उभारण्यात आले, त्यापैकी ५४ मचाण ऑनलाइन प्रणालीद्वारे नोंदणीकृत होते, ज्यातून नागरिकांचा मोठा प्रतिसाद दिसून आला. बफर क्षेत्रात एकूण २१० सहभागी या उपक्रमात सहभागी झाले. संकलित आकडेवारी आणि प्राथमिक विश्लेषणानुसार एकूण ५,७६५ वन्मप्राणी दर्शनांची नोंद करण्यात आली. शाकाहारी प्राण्यांचे (खुरधारी) प्रमाण सर्वाधिक असून ३,०८९ दर्शन (५३.६%) नोंदविण्यात आले, ज्यामुळे भासाखळी मजबूत असल्याचे दिसते. सर्वभक्षी (माकडे व रानडुक्कर) यांची १,५०० दर्शन (२६%) नोंद झाली. पक्ष्यांची ५७३ दर्शन (९.९%) नोंद झाली, ज्यातून जलाशयांभोवतीची पक्षी विविधता स्पष्ट होते.

मांसाहारी प्राण्यांमध्ये वाघ, बिबट्या इत्यादी २०९ दर्शन (३.६%) , लहान मांसाहारी २१२ दर्शन (३.७%) , प्रजातीवार ठळक नोंदी वाघ दर्शन ४२ (कोअर १९, बफर २३) , बिबट्या दर्शन १३ (कोअर ५, बफर ८) मुख्ध शाकाहारी प्राण्यांची लक्षणीय उपस्थिती होती. चितळ १,७०० पेक्षा अधिक दर्शन , सांबर ६०० पेक्षा अधिक दर्शन , गवा ५०० पेक्षा अधिक दर्शन याशिवाय नीलगाय (रोही), भेकर, रानडुक्‌कर, मगरी तसेच भारतीय मोरासह विविध पक्ष्यांची नोंद झाली. ही आकडेवारी कोअर व बफर क्षेत्रांमध्ये संतुलित भक्ष्य-भक्षक साखळी असलेली सुदृढ परिसंस्था दर्शवते.

प्रभू नाथ शुक्ला “या उपक्रमातून मिळालेली माहिती ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील दीर्घकालीन वन्य जीव निरीक्षण, अधिवास व्यवस्थापन आणि संवर्धन नियोजनासाठी अत्यंत उपयुक्त ठरेल.”

अशा प्रकारे कोअर ३९५२  आणि बफर १८१३   एकूण ५७६५ वन्य जीवांची नोंद झाली. अशी माहिती प्रभू नाथ शुक्ला क्षेत्र संचालक ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प चंद्रपूर यांनी दिली आहे.

 

Jaypal Gedam

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

error: Content is protected !!