चंद्रपुर ( मुक्तीवाद सेवा ) : वनविभाग चंद्रपुर अंतर्गत परिक्षेत्र सावली, उपक्षेत्र व नियतक्षेत्र पाथरी मधील वन कक्ष क्रमाक २९८ राखीव वन मधिल दिनांक २३.३.२६ रोजी वाघाच्या शरिराचे काही अवयव कुजलेल्या अवस्थेत असल्याची व त्यातील काही अवयव काढुन ठेवल्या संदर्भात तक्रार प्राप्त झाल्यावर वनविभागाने तात्काळ दखल घेत क्षेत्राची पाहणी केली असता दुपारी सुमारे १२ वाजता मृत वाघाचे काही अवयव कुजलेल्या अवस्थेत असल्याचे दिसुन आले.
त्यातील काही अवयव घटनास्थळावरुन गहाळ असल्याचे दिसुन आले. त्यानुसार प्राथमिक गुन्हा दाखल करण्यात आला असुन चंद्रपुर वनवृत्त चंद्रपुरचे मुख्य वनसंरक्षक आर.एम.रामानुजम (भावसे) यांच्या मार्गदर्शनात विभागीय वनअधिकारी चंद्रपुर वनविभाग चंद्रपुर राजन तलमले यांचे नेतृत्वात सहाय्यक वनसंरक्षक (तेंदु) चंद्रपुर वनविभाग चंद्रपुर वि.एस.तरसे, व वनपरिक्षेत्र अधिकारी (प्रा.) सावली विनोद सी. धुर्वे, यांचे चम्मु पुढील तपास करित आहे.
प्राथमिक चौकशी नंतर चार संशयीत आरोपींना ताब्यात घेण्यात आले असुन, न्यायालय प्रथम श्रेणी-१, सावली यांनी दिनांक २४.३.२६ रोजी तिन दिवसाची वनकोठडी सुनावली आहे. गुन्हयाचा पुढील तपास सुरु असुन सविस्तर अहवाल प्रसिदध करण्यात येईल अशी माहिती देण्यात आली. गुन्हे तपासकामी बंडु धोतरे NTCA प्रतिनिधी व मुकेश भांदकक्कर व
उमेशसिह झिरे, WPSI प्रतिनीधी तसेच परिविक्षाधिन वनपरिक्षेत्र अधिकारी दत्ता जाधव यांनी परिश्रम घेतले.
चंद्रपुर वनविभागातील सावली वनपरिक्षेत्राच्या पाथरी उपक्षेत्रात वाघाचा मृत्यु.
संपादक
जयपाल गेडाम


