Saturday, May 9, 2026
Homeआपला जिल्हामुलाच्या मृत्यूची सखोल चौकशी करून दोषीवर कार्यवाही करा. सुचिता भगत यांची मागणी.

मुलाच्या मृत्यूची सखोल चौकशी करून दोषीवर कार्यवाही करा. सुचिता भगत यांची मागणी.

चंद्रपूर : माझ्या मुलाने कुटूंबाच्या उदरनिर्वाहासाठी स्वतःच्या शेतासोबत शेजारच्याचे शेत ठेक्याने घेतले आहे. शिक्षणासोबतच तो शेतीचे कामही प्रामाणिकपणे करीत होता. घटनेच्या दिवशी १९ डिसेंबर रोजी तो सकाळी १०.३० वाजता नेहमीप्रमाणे मजूर रमेश वाढईसोबत शेतावर गेला. दुपारच्या सुमारास त्याला जेवणासाठी फोन केला असता तो येतो म्हणून म्हणाला. परंतू शेतात काम जास्त असल्याने तो येऊ शकला नाही. त्यानंतर ६.३० च्या सुमारास फोन केला असता त्याने फोन उचलला नाही. त्यामुळे चिंता वाटू लागली. आम्ही माय लेकी त्याला शोधण्यासाठी शेतावर गेले असता विद्यूत शॉक लागून त्याचा मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले. परंतू सदर विद्यूत तार ज्यांची शेती ठेक्याने घेतली त्या सुधाकर पाचभाई यांच्या चुकीच्या पध्दतीने टाकलेल्या तारामुळे तसेच नकळत विद्यूत प्रवाह सुरु केल्याने माझ्या मुलाचा मृत्यू झाल्याचा आरोप सुचिता भगत यांनी पत्रपरिषदेत केला असून या प्रकरणाची चौकशी व्हावी व दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे.
चंद्रपूर तालूक्यातील साखरवाही येथे वास्तव्यास असलेल्या सुचिता भगत यांना एक मुलगा तन्मय आणि मुलगी धनश्री आहे. काही वर्षापुर्वी त्यांच्या पतीचे निधन झाल्यानंतर घरची सर्व जबाबदारी मुलगा तन्मय (१९) याने घेतली. त्यांच्याकडे शेती असून तो शेतीचे काम करायचा आणि आपले शिक्षणही पुर्ण करीत होता. त्याने आपल्या शेतीसोबतच सुधाकर पाचभाई यांची शेती देखील ठेक्याने घेतली होती. १९ डिसेंबर रोजी नेहमीप्रमाणे तो शेतात गेला. दिवसभर शेतात काम केल्यानंतर दुपारच्या सुमारास आई सुचिताने जेवणासाठी फोन केला असता मी थोडावेळाने येतो असे सांगितले. त्यानंतर ६.३० पर्यंत वाट पाहूनही तो आला नसल्याने त्यांनी परत फोन केला. परंतू तन्मयने फोन उचलला नसल्याने चिंताग्रस्त होऊन मुलीला घेऊन त्या शेताकडे गेल्या. परंतू तेथील दृष्य पाहून त्या मायलेकी पुर्णतः हादरुन गेल्या. तन्मय विद्यूत शॉक लागल्याने त्याचे संपूर्ण शरीर भाजून गेले होते. त्याच्या मृत्यूबाबत गावकर्‍यांना विचारणा केली असता त्यांनी हातपाय धुवायला गेल्यानंतर विद्यूत तारेचा स्पर्श होऊन त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. यावेळी पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविला. सदर विद्यूत तार सुधाकर पाचभाई यांच्या शेतातून गेल्याने व निष्काळजीपणे त्यांनी विद्यूत प्रवाह सुरु केल्याने माझ्या मुलाचा मृत्यू झाला असा आरोप सुचिता भगत यांनी पत्रपरिषदेत केला. याबाबत सखोल चौकशी करुन दोषींवर कारवाई करावी अशी मागणी सुचिता भगत यांनी केली आहे.

Jaypal Gedam

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

error: Content is protected !!