चंद्रपूर ( मुक्तिवाद सेवा) : सावली वनपरिक्षेत्रातील उपवनक्षेत्र व्याहाड, नियतक्षेत्र सिर्सी मधील मौजा कढोली लगतचे वनविभागाचे जागेतून विनापरवानगी उत्खनन करून वाहतुक केल्याबाबत तीन ट्रॅक्टर व एक जेसीबी दि. २१/११/२५ रोजी जप्त करण्यात आली.
दरम्यान अनंत राखुंडे क्षेत्र सहायक व्याहाड व महादेव मुंडे वनरक्षक सिर्सी यांनी व्याहाड उपक्षेत्र अंतर्गत रात्रकालीन वनगस्त करीत असताना मौजा कढोली गावालगत वनविभागाचे मालकीचे गट क. १४४ मध्ये व्यावसायिक दृष्ट्या अवैध उत्खनन करीत असल्याचे निदर्शनास आल्याने वनगुन्हा क्रमांक २०४/२३२८५२/२०२५ दिनांक २१/११/२५ अन्वये भारतीय वन अधिनियम १९२७ चे कलम ३३ (१) ई व ३५ (१) ग नुसार वनगुन्हा नोंदवून सदरचे वनगुन्हयातील सहभागी मल्लेश नरसय्या मेरफुलवार रा. हरंबा यांचे मालकीचे १) जेसीबी, रंग-पिवळा, क्रमांक MH-३३/४४८७ चेसिस कमांक HAR3 DXSSL01893466 व महिंद्रा कंपनीचे ट्रॅक्टर B275DI- रंग-लाल MH34/BV-5332 (माती भरलेला) चेसिस कमांक MBNADAEXLMN C01812 (ट्रॉली क. नाही, रंग-लाल) (माती भरलेला) २) श्रीमती सिंदूबाई किसनदेव बोदलकर रा. उपरी यांचे मालकीचे ट्रॅक्टर कंपनी स्वराज्य 843XM, ट्रॅक्टर क. नाही, रंग-निळा चेसिस क्रमांक UZTB79628127986 (ट्रॉली क. नाही, रंग लाल) ३) राजेश नामदेव सातपुते रा. उपरी यांचे मालकीचे ट्रॅक्टर कंपनी स्वराज्य 735FE, (ट्रॅक्टर क. नाही) रंग-निळा व पांढरा (कमांक नाही) चेसिस क्रमांक MBNAK49AHRTB25738 (ट्रॉली क. नाही, रंग लाल) ट्रॉली चेसिस क्रमांक AL240315824
वरीलप्रमाणे चारही वाहने वनविभागाव्दारे जप्त करण्यात आली असून सदरचे मोहीमेकरीता सतिश नागोसे वनरक्षक चितेगांव, रमेश बोनलवार वनरक्षक टेकाडी, सतिश मजोके, बंडू दुधे, रवि सोनुले, मारोती पिपरे, नेहरू पाल व पीआरटी चमू सिर्सी यांनी मोलाचे सहकार्य केले असून पुढील तपास राजन तलमले विभागीय वन अधिकारी चंद्रपूर व विकास तरसे सहायक वनसंरक्षक चंद्रपूर वनविभाग चंद्रपूर यांचे मार्गदर्शनाखाली विनोद धुर्वे वनपरिक्षेत्र अधिकारी करीत आहे.


