Saturday, May 9, 2026
Homeआपला जिल्हापक्षी सप्ताहानिमित्त ताडोबात जनजागृती.

पक्षी सप्ताहानिमित्त ताडोबात जनजागृती.

चंद्रपूर ( मुक्तिवाद सेवा ) :
आज पक्षी सप्ताहाच्या तिस-या दिवशी ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या अधिकारी व कर्मचा-यांनी विविध ठिकाणी पक्षी निरीक्षण केले.
खडसंगी उपक्षेत्रात सकाळी नवेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांना पक्षी सप्ताहाचा उद्देश विषद करुन पक्षी ओळख, निरीक्षण आणि संर्वधन याबाबत माहिती देण्यात आली. यावेळी इको विकास समिती, नवेगाव अध्यक्ष निखिल चौके, मार्गदर्शक व उपक्षेत्रातील सर्व वनकर्मचारी उपस्थित होते.
कारवा वन्यजीव परिक्षेत्रातील रानतळोधी उपक्षेत्रामधील रानतळोधी गाव तलाव येथे पक्षी निरीक्षण करण्यात आले. यावेळी आढळलेल्या ४४ प्रजातींची नोंद e-bird पोर्टलवर करण्यात आली.
काटवल तलाव येथेही पक्षी सप्ताहानिमित्त पक्षी निरीक्षण करण्यात आले. कोळसा परिक्षेत्रातील कोळसा तलाव परिसरात पक्ष्यांच्या एकूण 33 प्रजातींची नोंद करण्यात आली.

मोहर्ली वन्यजीव परिक्षेत्रात ठाणेगाव नियतक्षेत्रातील ठाणेगाव बोडी, फुटकी बोडी, बाह्यसीमा शेतशिवार परिसरात पक्षी निरीक्षण करण्यात आले. यावेळी २५ प्रजाती नोंदविण्यात आल्या.
पक्षी निरीक्षणाच्या या उपक्रमात संबंधित वनपरिक्षेत्र अधिकारी, वनपाल, वनरक्षक, मदनीस, तसेच निसर्ग मार्गदर्शक सहभागी झाले होते.

Jaypal Gedam

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

error: Content is protected !!