चंद्रपूर ( मुक्तिवाद सेवा ) : दिनांक २०/१०/२५ ला मुक्तिवादने धाबा वनपरिक्षेत्र कार्यालयाची सत्यस्थिती वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला होता. आणि वरिष्ठ अधिकारी सदर बातमीची गंभीर दखल घेतील आणि धाबा वनपरिक्षेत्राच्या वनपरिक्षेत्र अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना वठणीवर आणतील अशी अपेक्षा केली होती. मात्र तसे असे झाले नाही. आणि त्याची शाई वाळतही नाही , तर पुन्हा एका तरुण महिलेला आज जीव गमवावा लागला. तेव्हा कुंभकर्णी झोपेत असलेल्या अधिकाऱ्यांना केव्हा जाग येईल ? असा प्रश्न आता सामान्य नागरिकांना पडला असून वेळीच जर दखल घेतली असती तर आज अलकाताई जिवंत राहिल्या असत्या. मात्र ना अधिकाऱ्यांनी दखल घेतली ना अलकाताई जिवंत राहिल्या. मग अजून किती ? जणांचा जीव जात पर्यंत वनविभाग झोपा काढणार याचे उत्तर सापडता सापडेना.
प्राप्त झालेल्या विश्वसनीय माहितीनुसार चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्याच्या गणेशपिपरी गावातील महिला सौ. अलकाताई पांडुरंग पेन्दोर या नेहमीप्रमाणे आपल्या पतीसह शेतावर गुरांना गवत कापण्यासाठी गेल्या होत्या. तर पती पांडुरंग पेंदोर त्याच शेतात मात्र काही दूर अंतरावर फवारणी करत होते. तेवढ्यात गवत कापण्यात व्यस्त असलेल्या अलकाताईवर अचानकपणे वाघाने हमला करून ठार केले. जेव्हा पती पांडुरंग यांनी आपल्या पत्नीला घराकडे जाण्यासाठी आवाज दिला तेव्हा पत्नीकडून कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद मिळाला नसल्याने ती घराकडे गेली असावी. असे समजून पांडुरंग घरी परतले. मात्र घरी आपली पत्नी आली नसल्याचे कळताच तातडीने शेताकडे धाव घेतले. आणि शेतात पत्नीवर वाघाने हल्ला करून ठार केल्याचे निदर्शनास येताच एकच हंबरडा फोडला. व गावकऱ्यांनीही घटनास्थळाकडे धावा धाव केले. वृत्त लिहीपर्यंत सदर महिलेचा शेव शेतातच पडून होता. सदरची घटना सायंकाळचे चार वाजता दरम्यानची असावी. असा अंदाज वर्तविल्या जात असून सदर घटनेने गणेशपिपरीसह आजूबाजूच्या गावात हळहळ व्यक्त केल्या जात आहे.
तर वनविभागावर रोषही व्यक्त केल्या जात आहे. कारण धाबा वनपरिक्षेत्राचे वनपरिक्षेत्र अधिकारी , गोंडपिपरीचे क्षेत्र सहाय्यक व बीट वनरक्षक कोणीही घटनास्थळी तातडीने पोहोचले नव्हते. शेवटी मुक्तीवादने दोनवेळा भ्रमणध्वनीवरून वनपरिक्षेत्र अधिकारी यांचेशी संपर्क करण्याचा प्रयत्न केल्यानंतर ” निघालोच जात आहे ” असे सांगितले. आणि शेवटी साडेसातच्या सुमारास वन विभागाचे कर्मचारी पोहोचले. म्हणजेच धाबा वनविभाग कितपत जागरूक आहे ? हे सततच्या झालेल्या दोन घटनेवरून सिद्ध होते. एकीकडे वनपरिक्षेत्र अधिकारी रविवार साजरा करण्यात व्यस्त आहेत. तर दुसरीकडे वाघाने अलकाताईला फस्त केले आहे.
संताप जनक : वनपरिक्षेत्र अधिकारी रविवार साजरा करण्यात व्यस्त , वाघाने केला अलकाताईला फस्त.
संपादक
जयपाल गेडाम


