Saturday, May 9, 2026
Homeआपला जिल्हाशेतकऱ्याचा घोट घेणारी वाघीण अखेर जेरबंद.

शेतकऱ्याचा घोट घेणारी वाघीण अखेर जेरबंद.

चंद्रपूर ( मुक्तीवाद सेवा ) : मागील दीड महिन्यापासून सावली वनपरिक्षेत्रात धुमाकूळ घालणाऱ्या वाघिणीला आज दिनांक ७ / ९ / २५ रोजी सायंकाळी पाच वाजता वनविभागाचे संरक्षित वन कक्ष क्रमांक १६६२ मध्ये जेरबंद करण्यात सावली वनविभागास यश आले आहे.

सदरची मोहीम रामानुजम मुख्य वनसंरक्षक चंद्रपूर, राजन तलमले विभागीय वन अधिकारी चंद्रपूर यांचे मार्गदर्शनात तसेच विकास तरसे सहाय्यक वनसंरक्षक , विनोद धुर्वे वनपरिक्षेत्र अधिकारी सावली यांचे नेत्रुत्वत अक्षय नारनवरे जीवशास्त्रज्ञ, नंदकिशोर पाटील क्षेत्र सहाय्यक पाथरी, अनिल मेश्राम व वनरक्षक नान्हे, खुडे, कराड, नागोसे, आदे, आखाडे, बोनलवार, मुरकुटे, बोरकर, अहिरकर, सोनेकर, डांगे, महादेव मुंडे, अतीन मानकर, पीआरटी चमू निफंद्रा, खानाबाद, व करगाव यांचे सहकार्याने पार पडली. डॉ. कुंदन पोडचेलवार TTC चंद्रपूर, घनश्याम नायगावकर, वनपरिक्षेत्र अधिकारी चंद्रपूर व RRU टीम चंद्रपूर यांनी सदर वाघिणीस जेरबंद केले. त्यामुळे जनमानसास समाधान लाभले असून नागरिक वनविभागाचे आभार मानत आहेत.

Jaypal Gedam

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

error: Content is protected !!