Saturday, May 9, 2026
Homeआपला जिल्हाबोर्डा येथील शासकीय आश्रमशाळेत प्रवेशोत्सव व पालक मेळावा संपन्न.

बोर्डा येथील शासकीय आश्रमशाळेत प्रवेशोत्सव व पालक मेळावा संपन्न.

चंद्रपूर (मुक्तीवाद सेवा) : दिनांक 27 जून2025 ला शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्या आश्रमशाळा बोर्डा ता. जि. चंद्रपूर येथे शैक्षणिक सत्राची सुरूवात प्रवेशोत्सव तथा पालक मेळावा आयोजित करून करण्यात आली.
या कार्यक्रमास गिरीजा उईके सहाय्यक प्रकल्प कार्यालय चंद्रपूर , अपर आयुक्त कार्यालय नागपूर, कु. प्रिया मुन लघुटंकलेखक , प्रतिभा पेंदोर अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती , सलामे विभागीय समन्वयक , प्रथम फाउंडेशन, नागपूर,शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष, सदस्य, गावातील प्रतिष्ठित नागरिक व विद्यार्थी तसेच पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आजच्या प्रवेशोत्सवाची सुरुवात शाळेतील नवागत विद्यार्थ्यांना बैलगाडीतून मिरवणूक काढून प्रभात फेरीने करण्यात आली. बैलगाडीला आकर्षक पद्धतीने सजवण्यात आले होते. विद्यार्थ्यांना बैलगाडीतून प्रवास करताना अत्यंत आनंद झाला . तदनंतर पाहुण्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांवर फुलांचा वर्षाव करून त्यांना शाळेच्या प्रवेशद्वारातून आत आणण्यात आले. आलेल्या पाहुण्यांनी प्रथम प्रवेशोत्सवाच्या निमित्ताने शाळेमध्ये वृक्षारोपण केले. नंतर शाळेतील विद्यार्थ्यांनी बनवलेल्या हस्तकला आणि चित्रकला प्रदर्शनी लावण्यात आली होती. त्या प्रदर्शनीचे फित कापून उद्घाटन उईके मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र चिचपल्लीच्या वतीने उपस्थित विद्यार्थ्यांची सिकलसेल व आरोग्य तपासणी करिता लावण्यात आलेल्या कॅम्पला सुद्धा मान्यवरांनी भेट दिली.
आणि मुख्य कार्यक्रमाला सुरुवात झाली. सर्वप्रथम आद्य क्रांतिकारक भगवान बिरसा मुंडा व स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
नंतर शाळेतील सुरू असलेले शैक्षणिक उपक्रम तसेच मागील वर्षात विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीचा उल्लेख करत व प्रवेशोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यामागचा हेतू तसेच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासात पालकांची भूमिका व पालकांनी विद्यार्थ्यांना शाळेत नियमित उपस्थित करण्याचे आवाहन आपल्या प्रास्ताविकातून शाळेचे मुख्याध्यापक खवशी सर यांनी केले.व उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते शाळेत नव्याने प्रवेशित झालेल्या विद्यार्थ्यांना स्कूल बॅग व वॉटर बॉटलचे वाटप करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना नवीन पाठ्यपुस्तके सुद्धा वाटप करण्यात आले. याप्रसंगी उपस्थित सर्व पालकांचा सुद्धा गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. तर मंचावरील उपस्थितांचे वृक्ष देऊन स्वागत करण्यात आले. प्रकल्प कार्यालयाच्या प्रतिनिधी म्हणून उपस्थित असलेल्या कु. प्रिया मून यांनी तसेच सलामे सर यांनी उपस्थित पालकांना व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. अध्यक्षीय भाषणातून श्रीमती उईके यांनी आदिवासी समाजातील पालकांनी शिक्षणाप्रती जागृत होण्याचे पालकांना आवाहन केले. तसेच कोणत्याही परिस्थितीत विद्यार्थी घरी राहणार नाही आणि शिक्षणापासून दूर जाणार नाही याबाबत दक्षता घेण्याचे सुद्धा पालकांना याप्रसंगी सांगितले. तसेच स्वतःचे उदाहरण घेऊन शिक्षण घेतांना कितीही त्रास झाला तरी ते अर्ध्यावर सोडू नये. व भविष्यात चांगले जीवन जगण्यासाठी शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही. अशा प्रकारचे विचार उईके यांनी याप्रसंगी मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या उच्च माध्यमिक शिक्षिका कु. अनुराधा लाड यांनी केले. तर आभार प्रदर्शन उच्च माध्यमिक शिक्षिका कु. जयश्री राऊत यांनी केले.
कार्यक्रम संपल्यानंतर उपस्थित पालक व विद्यार्थी यांना भोजन देण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, चतुर्थश्रेणी कर्मचारी, पालक , गावकरी तसेच विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी मोलाचे सहकार्य केले.असे
आर. टी. खवशी मुख्याध्यापक शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्या आश्रमशाळा बोर्डा यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.

Jaypal Gedam

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

error: Content is protected !!