गडचिरोली ( मुक्तीवाद सेवा ) : दिनांक-29/8/2024 ला शासकीय आदिवासी आश्रमशाळा अधीक्षक संघटना,नागपूर विभागाचे वतीने सहविचार सभा स्वप्न महल,सेलिब्रेशन हॉल, आरमोरी,जि. गडचिरोली येथे घेण्यात आली. सभेला सुधीरजी सरोते विभागीय अध्यक्ष,नागपूर विभाग ह्यांनी सभेचे अध्यक्षस्थान भूषविले. तर प्रमुख पाहुणे म्हणून ए. एम. म्हसतकर सर राज्य प्रसिद्धी प्रमुख सास , भारसागडे सर राज्य उपाध्यक्ष सास , सोनूले सर वाघमारे सर जेष्ठ सदस्य सास , जवंजाळ मॅडम वि.सचिव आणि कांबळे मॅडम ह्यांची प्रमुख उपस्थिती लाभली. सभेला नागपूर विभागातील बहुसंख्येने अधीक्षक महिला व पुरुष उपस्थित होते. सहविचार सभेमध्ये अधीक्षकांना आपले कार्य करताना येणाऱ्या अडचणीबाबत तथा संबंधित अनेक विषयांवर प्रकाश टाकण्यात आला.प्रामुख्याने महिला अधिक्षिकांचे मनोगतांमध्ये रात्रपाळीला महिला चौकीदाराची आवश्यकता ,महिला सफाईगाराची आवश्यकता, शाळेत सी. सी. टी.व्ही. कॅमेरे लावणे. मुलींच्या सुरक्षिततेसंबंधी आवश्यक असलेल्या इतर सोयी सुविधे बाबत आपले मत मांडले. अखिल कांबळे सर प्रकल्प अध्यक्ष गडचिरोली यांनी सभेचे प्रास्ताविक भाषण करताना संघटनेचे ध्येय धोरण व कर्मचाऱ्यांच्या अडीअडचणी बाबत विस्त्रुत माहिती दिले.व आपल्यावर होत असलेले अन्याय कशा प्रकारे हाताळता येईल यावर भर देऊन विविध उदाहरणाद्वारे उपस्थितांचे मनं जिंकले. तर संदेश खोब्रागडे सर यांनी सूत्रसंचालन केले. दरम्यान ए. एम. म्हसतकर सर यांनी आपले मत व्यक्त करताना अधीक्षक व अधिक्षिका यांच्यामध्ये समन्वय व सुसंवाद असणे आवश्यक आहे. तसेच दैनंदिन कार्य करताना आणि विविध उपक्रम राबवताना सहकार्य व सहयोग असणे कसे आवश्यक आहे . ह्याचे महत्व विशद केले. त्याचप्रमाणे त्यांनी त्यांचे शैलीमध्ये आपले मानसिक स्वास्थ जपणे व कोणत्याही प्रकारचा अतिरीक्त ताण निर्माण होणार नाही. ह्याची काळजी घेऊन,आरोग्याप्रति जागरूक राहून आपले कार्य करावे असे सांगितले.त्याचप्रमाणे सोनूले सर ह्यांनी आपले कर्तव्य करीत असताना येणाऱ्या अडचणीबाबत संघटीत होऊन कसे ? निराकरण करायचे. तसेच विनाचौकशी अधिक्षकांचे निलंबन करण्यात येऊ नये. याबाबत आपले मत व्यक्त केले. त्याचप्रमाणे भारसागडे सर ह्यांनी संघटनेला लीगल ऍडव्हाइझर असणे आवश्यक असल्याचे व त्याबाबत पुढील भूमिका ठरवण्याबाबत आपले विचार मांडले. तर जवंजाळ मॅडम महिला अधिक्षिका यांनी आपल्या समस्या सोडविण्यासाठी एकत्रित येऊन एकजूट दाखवने आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. विभागीय अध्यक्ष सरोते ह्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये महिला अधिक्षिकांच्या समस्या , विनाचौकशी अधीक्षकांचे निलंबन , विध्यार्थी सुरक्षिततेकरिता आवश्यक सोयी सुविधा ह्याबाबतीत लवकरच वरिष्ठ अधिकारी यांच्यासोबत बैठक घेण्यात येईल . तेंव्हा सर्व सदस्यांनी सक्रिय सहभाग देऊन आपले संघटन अधिक मजबुत करावे. लीगल एडव्हाईझर नेमणे,ह्या व इतर आवश्यक बाबतीत विभागीय संघटना सकारात्मक निर्णय घेऊन आपले कार्य अधिक जोमाने करेल. असा विश्वास व्यक्त केला. सहविचार सभेच्या यशस्वीतेकरिता गठीत सर्व समित्यांनी आपले कार्य उस्फुर्तपने पार पाडले. आणि आभार प्रदर्शन हेमंत धर्मे सर ह्यांनी केले. एकूणच अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात सहविचार सभेची यशस्वीपणे सांगता झाली. अशी माहिती अखिल कांबळे सर प्रकल्प अध्यक्ष गडचिरोली यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिले आहे.
सास संघटनेची सहविचार सभा आरमोरीत संपन्न.
संपादक
जयपाल गेडाम


