Saturday, May 9, 2026
Homeआपला जिल्हाबिबट्याला हाकलुन लावण्यासाठी ढोल ताशाचा वापर. सावली वनपरिक्षेत्र अधिकारी धुर्वे यांचा अनोखा...

बिबट्याला हाकलुन लावण्यासाठी ढोल ताशाचा वापर. सावली वनपरिक्षेत्र अधिकारी धुर्वे यांचा अनोखा उपक्रम.

चंद्रपूर ( मुक्तीवाद सेवा ) : सावली वनपरिक्षेत्रातील उपवनक्षेत्र सावली, नियतक्षेत्र सादागड मधील मौजा राजगड येथे मागील 5 दिवसापासून वन्यप्राणी बिबटचा धुमाकूळ असल्याने वनविभागाने कॅमेरा ट्रपव्दारे मागोवा घेवून त्या बिबट्यास जेरबंद करण्यासाठी 2 पिंजरे लावले असून सतत पिंज-यास हुलकावणी देत गावातील कुणाच्या बक-या तर कुणाच्या कोंबड्यावर ताव मारीत आहे. त्यामुळे वनविभागाने सदरचा बिबट राहात असलेल्या संशयीत ठिकाणाहून हुसकावून लावण्यासाठी बैंड वाजा व फटाके या नविन पध्दतीचा अवलंब करण्यात आला.

प्राप्त झालेल्या माहिती नुसार सविस्तर वृत्त असे की, सावली उपवनक्षेत्रातील मौजा राजगड येथे मागील 5 दिवसापासून वन्यप्राणी बिबट्याने धुमाकूळ घातला असून गावातील नागरीकांचे गोठ्यातून बक-या तर कधी कोंबड्या पळवून वनविभागाच्या हातावर तुरी देवून निसटण्यात सतत यशस्वी झाला.

सदर बिबट्या बंदोबस्त करण्यासाठी सावली वनपरिक्षेत्राचे वनपरिक्षेत्र अधिकारी विनोद धुर्वे यांचे नेतृत्वात सावलीचे वनक्षेत्र सहाय्यक राजु कोडापे व वनरक्षक सादागड लंकेश आखाडे यांनी ट्रॅप कॅमेराव्दारे मागोवा घेवून त्याच्या कायम बंदोबस्तासाठी नेहमीच्या येण्याजाण्याच्या मार्गावर गावालगत 2 पिंजरे लावले परंतु सदरचा बिबट पिंज-यात न जाता नव नवीन भागातून गावात प्रवेश करीत सतत हुलकावणी देत होता. यासाठी वनविभागाने नजीकच्या गावातील बैंड पार्टी यांचेशी संपर्क साधला व बिबट राहात असलेल्या संशयीत ठिकाणी गावक-यांशी चर्चा करून त्यांचे संमतीने दि. ९/४/२४ रोजी बिबट गावाशिवारात शिरकाव करण्याच्या वेळी वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी व गावकरी आणि बैंड पार्टी यांचे सहकार्याने शेतशिवारात असलेल्या मक्याच्या पिकातून वाजत गाजत बैंड पार्टी व फटाक्यांचे मोठ्या आवाजात जंगलाच्या दिशेने हाकलून लावले.

सदर प्रकरणी बिबट्याचा कायम बंदोबस्त होईपर्यंत विनोद धुर्वे, वनपरिक्षेत्र अधिकारी सावली, राजु कोडापे वनक्षेत्र सहाय्यक सावली, लंकेश आखाडे वनरक्षक सादागड हे बिबट्याचा कायम बंदोबस्त करण्यासाठी अहोरात्र गस्त करीत आहे.

Jaypal Gedam

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

error: Content is protected !!