चंद्रपूर ( मुक्तीवाद सेवा ) : चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघाच्या दि. 17 जानेवारी रोजी पार पडलेल्या आमसभेत 2024 -25 ते 2025- 26 या वर्षासाठी नविन कार्यकारिणी निवडणूक पार पडली. यात चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी दै. नवराष्ट्रचे जिल्हा प्रतिनिधी प्रशांत विघ्नेश्वर यांची निवड करण्यात आली. तसेच उपाध्यक्षपदी दै. भास्करचे जिल्हा प्रतिनिधी योगेश चिंधालोरे, सचिव दै. महासागरचे जिल्हा प्रतिनिधी प्रवीण बतकी, संघटन सचिव दै. नवराष्ट्रचे उपसंपादक बाळू रामटेके, सहसचिव दै. नवभारतचे उपसंपादक एजाज अली, कोषाध्यक्ष दै. भास्करचे उपसंपादक सुरेश वर्मा, कार्यकारिणी सदस्य दै. देशोन्नतीचे उपसंपादक रोशन वाकडे, दै. पुण्यनगरीचे उपसंपादक प्रशांत देवतळे,दै. देशोन्नतीचे उपसंपादक प्रकाश देवगडे, दै. नागपूर पोस्टचे जिल्हा प्रतिनिधी सुनिल बोकडे, दै. तरुण भारतचे उपसंपादक संदिप पाचभाई यांची निवड करण्यात आली.
निवडणूक अधिकारी म्हणून प्रा. डॉ . योगेश्वर दुधपचारे यांनी काम पाहिले. नवनिर्वाचित कार्यकारिणीचे माजी अध्यक्ष संजय तुमराम, मजहर अली,आशिष अंबाडे, महेंद्र ठेमस्कर,पंकज मोहरील,देवानंद साखरकर,कमलेश सातपुते यांच्या सह संघाच्या सदस्यांनी अभिनंदन केले व पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहे.
चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी प्रशांत विघ्नेश्वर तर सचिवपदी प्रविण बतकी यांची निवड.
संपादक
जयपाल गेडाम


