Saturday, May 9, 2026
Homeआपला जिल्हाचंद्रपुर वनपरिक्षेत्रात वाघाचा म्रुत्यु.

चंद्रपुर वनपरिक्षेत्रात वाघाचा म्रुत्यु.

चंद्रपूर ( मुक्तीवाद सेवा ) : ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील चंद्रपूर बफर वनपरीक्षेत्रात नियतक्षेत्र बोर्डा शेत सर्व्हे क्र. 250/1 मध्ये (T-51) नर वाघ मृत्यूमुखी झाल्याचे दिनांक 15/01/2024 रोजी निदर्शनास आले. सदर वाघ हा दिनांक 15/01/2024 ला कर्मचा-यांना गस्ती दरम्यान मृत अवस्थेत दिसून आला. वाघाचे सर्व अवयव शाबुत असुन घटनास्थळावर संकेत वाठोरे, सहाय्यक वनसंरक्षक (जंकास-2), बंडु धोतरे (NTCA) प्रतिनिधी तथा इको प्रो. (अध्यक्ष) व मुकेश भांदकर PCCF प्रतिनिधी यांचे समक्ष पाहणी करुन पंचनामा नोंदविण्यात आला व दिनांक 15/01/2024 रोजी राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरण (NTCA) यांनी दिलेल्या SOP नुसार पुढील कार्यवाही TTC चंद्रपूर येथे शवविच्छेदन करुन आवश्यक ते नमुने घेवून दहन करण्यात आलेले आहे.

सदर वाघ हा सन 2012-2013 मधील असल्याचे दिसुन येत आले आहे. व त्याचे वय हे जवळपास 12 वर्ष आहे. सदरहु वाघाचा मृत्यु इतर वाघाचे हल्यात झाल्याचे शरीरावरिल खुणा व घटनास्थळावरिल परिस्थीतीवरून दिसून. या प्रसंगी संकेत वाठोरे, सहाय्यक वनसंरक्षक (जंकास-2), बंडु धोतरे (NTCA) प्रतिनिधी तथा इको प्रो. (अध्यक्ष), मुकेश भांदकर, PCCF प्रतिनिधी, आर. एच. चौधरी वनपरीक्षेत्र अधिकारी चंद्रपूर (बफर), डॉ. कुंदन पोडचेलवार पशुवैद्यकीय अधिकारी TTC चंद्रपूर, डॉ. रविकांत खोब्रागडे, (पशुवैद्यकीय अधिकारी, ताडोबा), क्षेत्र सहाय्यक घंटाचौकी व बिट वनरक्षक चेकनिंबाळा व बिट वनरक्षक बोर्डा उपस्थित होते.अशी माहिती उपसंचालक कुशाग्र पाठक यांनी दिले.

Jaypal Gedam

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

error: Content is protected !!