Saturday, May 9, 2026
Homeआपला जिल्हालाचखोर वनपरिक्षेत्र अधिकारी प्रमोद जेनेकर अँटी करप्शन ब्युरोच्या जाळ्यात.

लाचखोर वनपरिक्षेत्र अधिकारी प्रमोद जेनेकर अँटी करप्शन ब्युरोच्या जाळ्यात.

गडचिरोली ( मुक्तीवाद सेवा ) : वनपरिक्षेत्र पेरमिली ता. अहेरी जि. गडचिरोली येथील वनपरिक्षेत्र अधिकारी प्रमोद आनंदराव जेनेकर, वय ३८ वर्षे यांना ५,००,०००/- रूपयांची लाच स्विकारलेवरून अँटी करप्शन व्युरो, गडचिरोलीच्या पथकाने दिनांक ०४/०१/२०२४ रोजी रंगेहात पकडले.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, तक्रारदारास मौजा तुमरगुंडा ते कासमपल्ली रस्त्याचे कामावरील पकडलेली ट्रॅक्टर सोडण्याकरीता व ७२ लाख रूपयाची फाईन कमी करून ५ लाख रूपयापर्यंत फाईन करण्याकरीता प्रमोद आनंदराव जेनेकर, वय ३८ वर्षे, धंदा नोकरी, वनपरिक्षेत्र अधिकारी, वनपरिक्षेत्र पेरमिली ता. अहेरी जि. गडचिरोली यांनी १०,००,०००/- रुपये लाचेची मागणी केली होती. मात्र तक्रारदार यांना आरोपीस लाच रक्कम देण्याची मुळीच ईच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, गडचिरोली येथील अधिकाऱ्यांशी संपर्क साधुन तकारी दिली.त्यानुसार

पोलीस उपअधिक्षक, श्रीमती अनामिका मिर्झापूरे यांचे पर्यवेक्षणात पोलीस निरीक्षक श्रीधर भोसले लाचलुचपत प्रतीबंध विभाग गडचिरोली यांनी तक्रारदाराने दिलेल्या तकारीची अत्यंत गोपनीयरित्या शहानिशा करून सापळा रचण्याचे आयोजन केले असता, त्यामध्ये पडताळणी दरम्यान प्रमोद आनंदराव जेनेकर, वनपरिक्षेत्र अधिकारी पेरमिली यांनी तकारदार यास मौजा तुमरगुंडा ते कासमपल्ली रस्त्याचे कामावरील पकडलेली ट्रॅक्टर सोडण्याकरीता व ७२ लाख रूपयाची फाईन कमी करून ५ लाख रूपयापर्यंत करण्याकरीता १०,००,०००/- रुपये लाचेची पंचसाक्षीदारासमक्ष सुस्पष्ट मागणी केली व आपले लोकसेवक पदाचा दुरूपयोग करून स्वतःचे आर्थिक फायदयाकरीता वाम व भ्रष्ट मार्गाने तडजोडीअंती पाच लाख रुपये रुपये लाच रक्कम स्विकारतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या चमुने त्यांना रंगेहात पकडले. प्रमोद आनंदराव जेनेकर वनपरिक्षेत्र अधिकारी पेरमिली यांचेविरूध्द उप – पोलीस स्टेशन पेरमिली येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक राहुल माकणीकर, अँटी करप्शन ब्युरो नागपुर, सचिन कदम अपर पोलीस अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो नागपूर यांचे मार्गदर्शनात पोलीस उपअधिक्षक श्रीमती अनामिका मिर्झापूरे अँटी करप्शन ब्युरो गडचिरोली, पोलीस निरीक्षक, श्रीधर भोसले सफा सुनिल पेदट्टीवार, नापोशि किशोर जौंजारकर, पोशि संदीप घोरमोडे, संदीप उडाण व चापोहवा नरेश कस्तुरवार यांनी मेहनत घेतले आहे.

Jaypal Gedam

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

error: Content is protected !!