बिजापूर , छत्तीसगड ( मुक्तिवाद सेवा ) : छत्तीसगड राज्यातील इंद्रावती टायगर रिझर्व बिजापूरच्या मद्येड बफर क्षेत्राच्या रुद्रारम येथे वाघाच्या चामडीची अवैध तस्करी करीत असताना वन विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी 29 जूनला तस्करांना पकडले होते. आतापर्यंत आरोपींची संख्या 39 वर पोहोचली असून सर्वांना जेलमध्ये पाठविण्यात आले आहे. सदर प्रकरणात डॉक्टर , मेडिकल स्टोरचे मालक यांचे सह काही पोलीस सुद्धा सामील असल्याचे बाब समोर आली असून इंद्रावती टायगर रिझर्वचे अधिकारी दोशींना कोणत्याही परिस्थितीत सोडण्याच्या तयारीत नसून सर्वांवर कायदेशीर कडक कार्यवाही करणार आहेत. त्यात चंद्रपूर जिल्ह्याच्या गोंडपिपरी तालुक्यातील सुद्धा धर्मराव नानाजी चापले आरोपी असून त्याचेसह शामराव शिवनकर , किशोर दशरारीया अशा तीन जणांनी दंतेवाडा कोर्टात जमानती करिता अर्ज दाखल केला होता. मात्र दन्तेवाडा कोर्टाने जमानतीच्या अर्जाला फेटाळला. त्यामुळे पुन्हा जेलची हवा खावी लागत आहे. सदर प्रकरणातील अजून पर्यंत सात आरोपी फरार असून अटकेतील सध्या सर्वजण न्यायालयीन कोठडीत आहेत.
वाघाची चमडी तस्करी प्रकरणातील धर्मराव नानाजी चापले सह दोघांची जमानत कोर्टाने नाकारली.
संपादक
जयपाल गेडाम


