चंद्रपूर ( मुक्तिवाद सेवा ) : जिल्ह्यातील भद्रावती तहसील कार्यालयात तहसीलदार, नायब तहसीलदार व इतर महसूल कर्मचारी यांनी शेत जमिनीचा फेरफार केला नाही व जाणीवपूर्वक त्रास देतं असल्याने परमेश्वर मेश्राम यांनी तहसील कार्यालय भद्रावती येथे दिनांक २६/९/२०२५ ला विष प्राशन करून आत्महत्त्या केली होती, आज जवळपास ७ महिने लोटून सुद्धा या प्रकरणी कुणावरही गुन्हे दाखल झाले नाही व त्यांच्या परिवाराला न्याय मिळाला म्हणून परमेश्वर मेश्राम यांच्या पत्नी वंदना परमेश्वर मेश्राम हया आपला मुलगा स्वप्नील याला सोबत घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिनांक १८ मे २०२६ पासून साखळी उपोषण तर दिनांक २४ मे २०२६ पासून आमरण उपोषण करण्यात येणार असल्याची माहिती वंदना मेश्राम यांनी पत्रकार परिषदेतून दिली आहे.

दिवंगत परमेश्वर मेश्राम यांचे माजी दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांचेशी व्यवहारिक संबंध होते, दरम्यान परमेश्वर मेश्राम यांना दारू पिण्याचा शौक असल्याने त्यांनी एका बड्या राजकिय नेत्याकडून काही पैसे घेतले होते, त्यांचा फायदा घेऊन त्यांचे नावे असलेली शेतजमीन सर्व्हे नंबर ९५ आराजी (१.१३ हे आर) व ९८ (१.०२ हे आर) असे एकूण २.१५ हे. आर जमीन एका बड्या राजकिय नेत्याला परमेश्वर मेश्राम दारूच्या नशेत असतांना परस्पर आपल्या नावे विक्री करून स्वतःचे भाऊ अनिल धानोरकर यांच्या नावाने करून घेतली, दरम्यान या प्रकरणी मृतकाचे भाऊ शंकर विश्वनाथ मेश्राम, महादेव विश्वनाथ मेश्राम यांनी भद्रावती दिवाणी न्यायालयात दावा दाखल केला की जी जमीन एका बड्या राजकिय नेत्याला विकली ती बेकायदेशीर आहे. त्यामुळे सदर जमिनीची बेकायदेशीर विक्री रद्द करून मूळ मालकाच्या नावाने सातबारा देण्यात यावा, दरम्यान या संबंधाने भद्रावती दिवाणी न्यायालय व जिल्हा सत्र न्यायालय इथे मेश्राम परिवरच्या बाजूने निर्णय लागला पण अनिल धानोरकर यांनी राजकीय दबाव टाकल्याने स्थानिक तहसीलदार, नायब तहसीलदार यांनी जमिनीचा फेरफार मेश्राम परिवाराच्या नावाने करण्यास टाळाटाळ केली, नायब तहसीलदार सुधीर खांडरे यांनी तर एक लाख रुपये फेरफार करण्यासाठी परमेश्वर मेश्राम यांचेकडून घेतले पण तरीही फेरफार केला असे मृतक परमेश्वर मेश्राम यांनी आपल्या सुसाईड नोट मध्ये नमूद केले आहे, परंतु परमेश्वर मेश्राम यांनी आत्महत्त्या पूर्वी सुसाईट नोट मध्ये लिहून ठेवले आहे, त्यात तहसीलदार नायब तहसीलदार यांचेसह इतरांची नावे आहेत, मेश्राम परिवार दलित असल्याने व त्यांचे कुणी ऐकत नसल्याने प्रशासनाद्वारे त्यांचेवर जाणीवपूर्वक अन्याय आणि अत्त्याचार करण्यात झाला आहे. दरम्यान परमेश्वर मेश्राम यांनी आत्महत्त्या केली विषय अजूनही अनुत्तरीत असून अजूनपावेतो मेश्राम परिवाराला न्याय मिळाला नाही, त्यामुळे अनिल धानोरकर, तहसीलदार राजेश भांडारकर, नायब तहसीलदार सुधीर खांडरे या तिघावार अनुसूचित जाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा, १९८९ अंतर्गत गुन्हे दाखल करून मृतकाचा मुलगा स्वप्नील परमेश्वर मेश्राम याला शासकीय नोकरी देऊन न्याय दयावा अन्यथा येणा-या १८ मे पासून संपूर्ण परिवार घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी व नंतर आमरण (अन्नत्याग) आंदोलन करू, असा इशारा वंदना मेश्राम यांनी पत्रकार परिषदेतून गृहमंत्री यांच्याकडे निवेदनातून दिला, यावेळी मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे, वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष महेश वासलवार, जनहीत कक्ष जिल्हा अध्यक्ष रमेश काळबांधे, सुनील गुढे व इतर महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.


