चंद्रपूर ( मुक्तिवाद सेवा ) : पोलीस स्टेशन दुर्गापूर अंतर्गत येतं असलेल्या मौजा वरवट येथील नामे धनराज धर्मदेव खोब्रागडे हा शेत शिवारात झुडपी जंगलातील नाल्यालगत हातभट्टी लावून मोहा फुलाची गावठी दारू काढत आहे अशा खबरे वरून पोलिसांनी तातडीने पोहचून सदरच्या घटनास्थळी जावून रेड केले आणि अपराध क्रं. 260/2026
कलम 65(ब),(क) ,(इ),(फ) म. दा.का. अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आले. सदरची कारवाई दिनांक 09/05/2026 चे 10.30 ते 11.30 वा. दरम्यान करण्यात आलेली असून दुपारी 2.50 गुण्याची नोंद करण्यात आली.
दरम्यान मोह फुलाच्या सडव्याने भरलेले 13 नग प्लॅस्टिकचे ड्रम मधील सडवा प्रत्येकी 50 किलो नि भरलेले एकूण 650 किलो , प्रति किलो 150/- रुपये प्रमाणे एकूण किंमत 97,500/- रु चा सडवा 2) 3 प्लास्टिक कॅन मध्ये एकूण मोहफूल गावठी दारू 49 लिटर किंमत अंदाजे प्रति लिटर 200/- रुपये याप्रमाणे एकूण किंमत 9,800/- रुपये 3) मोहापूर गावठी दारू काढण्यासाठी वापरलेले 5 नग मोठे लोखंडी ड्रम प्रति ड्रम 1000/- रुपये याप्रमाणे एकूण 5000/- रुपये 4) मोहापूर गावठी दारू काढण्यासाठी वापरलेले 13 नग प्लास्टिक ड्रम प्रति ड्रम 200/- रुपये याप्रमाणे एकूण 2600/- रुपये 5) 3 प्लास्टिक कॅन प्रत्येकी 50/- रुपये याप्रमाणे 150/- रुपये 6) दारू काढण्यासाठी 2 नग लाकडी चाटू किंमत अंदाजे 200/- रुपये 7) दारू काढण्यासाठी वापरलेले 3 नग टिनाचे पिपे किंमत 60/- रुपये प्रमाणे एकूण 180/- रुपये 8) दारू काढण्यासाठी वापरलेला प्लास्टिक पाईप 2 नग किंमत 200/- रुपये असा एकूण 1,15,630/- रु. चा मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे.

सदरची कार्यवाही परिविक्षाधीन पोलीस अधीक्षक कायंदे पाटील पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनात पो.उपनि. पंकज वासाडे , पो.उपनी बिंकालवार , पो. हवा. राणी ब. न. 1095 , पो. अ .संदीप ब.न.202 , पो. अ. मंगेश शेंडे ब नं. 1074,पो. अ. रुपेश सावे ब. नं. 868 ,
यांनी मोलाचे कार्य केले आहे.


