Wednesday, May 13, 2026
HomeUncategorizedव्याघ्र प्रगणनेच्या कार्यशाळेला राजोलीचे वनपाल अनाधिकृतपणे गैरहजर. दखल घेणे गरजेचे.

व्याघ्र प्रगणनेच्या कार्यशाळेला राजोलीचे वनपाल अनाधिकृतपणे गैरहजर. दखल घेणे गरजेचे.

 

 चंद्रपूर ( मुक्तिवाद सेवा ) : चंद्रपूर वन विभाग चंद्रपूर अंतर्गत येत असलेल्या सावली वनपरिक्षेत्राच्या उपक्षेत्र राजोली येथील वनपाल हे सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने वनविभागाच्या कर्तव्यात कामचुकार म्हणून स्वतःची ओळख निर्माण करणारे वनपाल आता पुन्हा वादाच्या भोवऱ्यात आले असून नुकत्याच पार पडलेल्या व्याघ्र प्रगणनेच्या कार्यशाळेला कोणत्याही संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्याच्या पूर्वपरवानगी शिवाय गैरहजर असल्याची बाब समोर आली आहे.

      प्राप्त झालेल्या माहितीनुसार उपक्षेत्र राजोली येथे मागील चार वर्षापासून कार्यरत असलेले वनपाल महाशय सरकारी कामात कामचुकारपणा , बनवाबनवी आणि खोटे बोलण्यात पारंगत असलेले सदरचे वनपाल हे दिनांक १०/५/२०२६ रोजी वनपरिक्षेत्र सावली येथील व्याघ्र प्रगणनेच्या आयोजित कार्यशाळेला वरिष्ठ अधिकाऱ्याची कोणतीही परवानगी न घेता अथवा संबंधितांना कोणत्याच प्रकारची माहिती न देता गैरहजर असल्याने वरिष्ठा करिता सदरचे वनपाल डोकेदुखी ठरत असल्याची बाब समोर आली आहे.
मात्र सरकारी कामाचा लाभ पूर्ण घ्यायचा . आणि काम मात्र करायचेच नाही. आपली जबाबदारी झटकायची आणि आपण किती जबाबदारीने काम पार पडतो. याचा खोटा आणि बनाव प्रमाणपत्र निर्माण करायच. अशाप्रकारचे काम अत्यंत निमूटपणे पार पाडत असतात. परंतु वस्तुस्थिती मात्र काही ‘ औरच ‘ असते. ही बाब वन विभागासाठी चिंतेची असून संबंधित वरिष्ठांनी दखल घेणे गरजेचे आहे.

यापूर्वी सुद्धा एक ते दीड महिन्या आधी मृत झालेली वाघीण सदर उपक्षेत्राचे वनरक्षक आणि सहकारी जंगलात गस्त घालत असताना त्यांना  आढळली होती. आणि वाघिणीचा केवळ सांगाडाच सापडला होता. तत्पूर्वी सदरचे वनपाल हे आठवडाभर कोणत्याही अधिकाऱ्यांना कोणत्याच प्रकारची पूर्वकल्पना अथवा परवानगी न घेता आपल्या मर्जीने अचानकपणे गायब होते. त्यामुळे वन्यजीव प्रेमीमध्ये मोठी नाराजी निर्माण झाली होती. आणि वनविभागाच्या कामात अडथळाही निर्माण झाला होता. आता मात्र व्याघ्र प्रगणना यासारख्या महत्त्वपूर्ण कार्यशाळेलाच अनाधिकृतपणे गैरहजर राहणे हे खीतपत योग्य आहे. आतातरी याची दखल वरिष्ठ घेणार का ? असा प्रश्न निर्माण होत आहे.

 

Jaypal Gedam

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

error: Content is protected !!