Wednesday, May 13, 2026
Homeआपला जिल्हाअर्ज मागे घेतले नाही. तरी अंतिम यादीत नाव नाही. प्रभाग क्र. २...

अर्ज मागे घेतले नाही. तरी अंतिम यादीत नाव नाही. प्रभाग क्र. २ ड गटातील दिनेश मिश्रा यांची व्यथा.

चंद्रपूर : महानगरपालिकेच्या प्रचाराला वेग आला असून अनेक उमेदवारांनी घरोघरी जाऊन प्रचार करायला सुरुवात केली आहे. परंतू प्रभाग क्र. २ ड (खुला वर्ग) या क्षेत्रातून नामनिर्देशन अर्ज भरलेल्या दिनेश राम बिशाल मिश्रा यांनी अर्ज मागे घेण्यासाठी कोणतीही सुचना दिली नसतांना तसेच अर्जात कोणती त्रृटी आढळल्यास याबाबत निवडणूक आयोगाने पुर्वसुचना दिली नसताना देखील अंतिम यादीमध्ये त्यांचे नाव समाविष्ट करण्यात आले नाही. याबाबत त्यांनी तहसिलदार व बिडीओ यांना विचारणा केली असता त्यांनी थातूरमातूर उत्तर दिले. त्यामुळे दिनेश मिश्रा निराश झाले असून निवडणूकीच्या तोंडावरच अश्याप्रकारचा अन्याय झाला असल्याची व्यथा त्यांनी पत्रपरिषदेत मांडली.
येथील शास्त्रीनगर, तलाव वार्ड येथील रहिवासी दिनेश राम बिशाल मिश्रा यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून नामनिर्देशन अर्ज निवडणूक आयोगाकडे दाखल केला. यामध्ये त्यांनी एबीफार्म देखील दिला. अर्ज दाखल करतांना त्यात कोणतीही तृटी राहू नये याबाबत त्यांनी खबरदारीही घेतली होती. २ जानेवारी रोजी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख होती. परंतू निवडणूक आयोगाने अर्जामध्ये कोणती त्रृटी राहिली का याबाबत कोणतीही पुर्वसुचना दिली नाही. ३ जानेवारी रोजी ज्यावेळी अंतिम यादी प्रकाशित करण्यात आली होती. त्यात दिनेश मिश्रा यांचे नाव टाकण्यात आले नव्हते. त्यामुळे दिनेश मिश्रा यांना आश्चर्य वाटले. त्यांनी याबाबत तहसिलदार व त्यानंतर बिडीओ यांची भेट घेऊन जाब विचारला असता आमचे साहेब बाहरेगावी गेले आहे. ते आल्यानंतरच कारण स्पष्ट होईल असे उत्तर दिले. त्यामुळे दिनेश मिश्रा यांनी संताप व्यक्त केला. प्रचाराला अतिशय कमी वेळ शिल्लक असतांना यादीतून नाव वगळल्याने प्रचारही करता येत नाही आहे.याबाबत निवडणूक आयोगाने त्वरित खुलासा करावा अशी मागणी दिनेश मिश्रा यांनी पत्रपरिषदेत केला आहे.यावेळी देवेंद्र इंगोले, बबलू इसार, संजय ठाकूर व फकरुद्दिन ख्वाजा या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या पदाधिकार्‍यांची उपस्थिती होती.

Jaypal Gedam

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

error: Content is protected !!