Wednesday, May 13, 2026
Homeआपला जिल्हाआ. देवराव भोंगळेच्या गरबामुळे आश्रम शाळेतील मुलींची सुरक्षा धोक्यात.

आ. देवराव भोंगळेच्या गरबामुळे आश्रम शाळेतील मुलींची सुरक्षा धोक्यात.

चंद्रपूर ( मुक्तीवाद सेवा ) :
नवरात्रोत्सवा दरम्यान गोंडपिंपरी येथील आश्रम शाळेच्या मैदानावर गरबा दांडियाचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या काळात आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांच्या परीक्षा आहेत. गरबा आणि दांडिया आयोजित केल्याने त्यांच्या अभ्यासात व्यत्यय येऊ शकतो. आणि त्यांच्या शिक्षणाला हानी पोहोचू शकते. या संदर्भात, आदिवासी टायगर सेनेचे अ‍ॅड. संतोष कुलमेथे यांनी पत्रकार परिषदेद्वारे मागणी केली आहे की या कार्यक्रमाची आणि विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान करणाऱ्या आश्रम शाळेची परवानगी रद्द करावी. आणि या कार्यक्रमाला परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्याला तात्काळ निलंबित करावे.
त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, आदिवासींच्या शैक्षणिक विकासासाठी आदिवासी विकास विभागाने अनुदानित आश्रम शाळा सुरू केल्या आहेत. तथापि, शिक्षण देण्याऐवजी, या आश्रम शाळा नैतिक शिक्षणाकडे दुर्लक्ष करत आहेत. आणि धार्मिक शिक्षण देताना दिसतात. एकीकडे राज्य सरकारने आदिवासींची एक वेगळी संस्कृती आहे. असा अध्यादेश जारी केला आहे. जर त्यांच्या घरात देवतांच्या प्रतिमा असतील किंवा हिंदू देवतांची पूजा करताना दिसले तर त्यांना जात प्रमाणपत्र दिले जाऊ शकत नाही. दुसरीकडे, अनुदानित आश्रम शाळा नऊ दिवसांसाठी देवीचा उत्सव साजरा करत असल्याचे दिसून येत आहे. आश्रम शाळेत शेकडो विद्यार्थी आहेत आणि काही दिवसांत त्यांच्या परीक्षा येत आहेत. त्याचप्रमाणे शाळेत अनेक मुली सुध्दा शिक्षण घेत आहेत. त्यामुळे मुलींची सुरक्षासुध्दा धोक्यात येऊ शकते. तसेच केव्हापण एखादी अनुचित घटना घडू शकते. असेही पत्रकार परिषदेत सांगितले.
गोंडपिपरी येथील श्रीमती सुभद्राबाई सांगडा पाटील आश्रम शाळेत नऊ दिवसांसाठी शाळेच्या आवारात संध्याकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत डीजे संगीत वाजवून गरबा दांडिया महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक व मानसिक तसेच शारीरिक सुध्दा नुकसान करणाऱ्या आश्रम शाळेची मान्यता रद्द करण्यात यावी. आणि त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत. शाळेच्या आवारात दांडिया गरबा वाजवण्यास परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्याला निलंबित करण्याचीही मागणी आदिवासी टायगर सेनेने केली आहे. अन्यथा चंद्रपूर येथील प्रकल्प कार्यालय आणि जिल्हा दंडाधिकारी कार्यालयासमोर अनिश्चित काळासाठी धरणे आंदोलन करण्याचा इशारा अधिवक्ता संतोष कुलमेथे यांनी दिला आहे.
पत्रकार परिषदेला युवा विदर्भ अध्यक्ष अभियंता अभिलाष परचाके, विदर्भ सचिव साईनाथ कोडापे, माजी सैनिक द्रफुल आत्राम उपस्थित होते.

Jaypal Gedam

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

error: Content is protected !!