Wednesday, May 13, 2026
Homeआपला जिल्हाआजपासून विदर्भ कोकण ग्रामीण बैंक आणि महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे एकत्रिकरण होऊन महाराष्ट्र...

आजपासून विदर्भ कोकण ग्रामीण बैंक आणि महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे एकत्रिकरण होऊन महाराष्ट्र ग्रामीण बैंक म्हणून कामकाज सुरू होणार.

चंद्रपूर ( मुक्तीवाद सेवा ):
भारत सरकार च्या एक राज्य एक ग्रामीण बैंक धोरणानुसार एक राज्य एक ग्रामीण बैंक या उद्देशाने महाराष्ट्र ग्रामीण बैंक या नविन प्रादेशिक ग्रामीण बैंकेचा कार्यारंभ आणि स्थापना समारोह १ मे ला आयोजित केला असल्याची माहीती आयोजित पत्रकार परिषदेत महाराष्ट्र ग्रामीण बैंकेच्या क्षेत्रीय कार्यालयाचे रिजनल मैनेजर राजकुमार जाधव यांनी दिली.
ते म्हणाले की, राज्यातील तात्कालीन विदर्भ कोकण ग्रामीण बैंक आणि महाराष्ट्र ग्रामीण बैंकचे एकत्रिकरण होऊन महाराष्ट्र ग्रामीण बैंक या नविन प्रादेशिक ग्रामीण बैंकेची स्थापना होत आहे. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथि म्हणून आदिवासी विकास आणि चंद्रपुर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. प्रा. अशोक उईके उपस्थित राहणार असून. उद्धाटन पालकमंत्री डॉ. उईके यांच्या हस्ते होणार आहे. हा कार्यक्रम १ मे रोजी सकाळी ९ वाजता विदर्भ कोकण ग्रामीण बैंक, क्षेत्रीय कार्यालय चंद्रपुर, हल्दीराम शोरूमच्या वर दूसरा मजला नागपुर रोड येथे आयोजित केला आहे. यावेळी डेप्युटी रिजनल मैनेजर राजकुमार कांबळे उपस्थित होते.

Jaypal Gedam

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

error: Content is protected !!