Wednesday, May 13, 2026
Homeआपला जिल्हायात्रेच्या भाविकांनी काय करावे.काय करू नये.याकरिता वनविभागाचे आवाहन.

यात्रेच्या भाविकांनी काय करावे.काय करू नये.याकरिता वनविभागाचे आवाहन.

चंद्रपूर ( मुक्तीवाद सेवा ) : राजुरा वनपरिक्षेत्र यांच्या वतीने दिनांक 16/12/2023 पासुन सुरू होत असलेल्या यात्रेकरीता भाविकांसाठी एक महिना परवानगी देणे संबंधात तसेच मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्याकरीता व यात्रे दरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये या करीता करण्यात येणा-या उपाययोजना बाबत श्वेता बोड्डू उपवनसंरक्षक मध्य चांदा वनविभाग चंद्रपूर यांचे मार्गदर्शनात व सुभाषभाऊ धोटे आमदार विधानसभा क्षेत्र राजुरा यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 16/12/2023 रोजी वननिरीक्षण कुटी राजुरा येथे सभेचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान एस. डी. येलकेवाड वनपरिक्षेत्र अधिकारी राजुरा यांनी सभेत सद्या स्थितीत राजुरा वनपरिक्षेत्रात वाघ, बिबट, अस्वल व इतर वन्य प्राणी अस्तित्वात असल्याबाबतची माहिती देवून मानव वन्यजीव संघर्ष टाळण्याकरीता व भाविकांच्या संरक्षणार्थ उपाययोजना सुचविल्या. त्याअनुषंगाने सदर सभेत मार्गशिर्ष महिण्यात सुरू होणा-या यात्रे करीता मान्यवर , अधिकारी व कर्मचारी यांनी चर्चा करून जोगापूर मंदिरामध्ये भाविकांना दर्शनाकरीता वेळ सकाळी 08.00 ते सांयकाळी 04.00 वाजेयपर्यंतच राहिल. सायंकाळी 04.00 वाजेनंतर कोणालाही प्रवेश मिळणार नाही. तसेच सायंकाळी 4.00 वाजेपर्यंत मंदिर परिसर खाली करावा लागेल , जोगापूर मंदिर परिसरात कोणतेही दुकाने लावता येणार नाही. पुजेचे साहित्य व प्रसादाच्या साहित्याची दुकाने जोगापूर गेटच्या बाहेर लावावे , भाविकांना सोबत फक्त पुजा साहित्य व प्रसाद नेता येईल. तथापी सोबत कोणत्याही प्लॉस्टीकचा वापर करता येणार नाही , भाविकांना जोगापूर मंदिरात जाण्या येण्याकरीता बसस्थानकावरून बस सेवा उपलब्ध करण्यात येत असुन 2 ते 3 बसेस सकाळी 08.00 ते सांयकाळी 4.00 वाजेपर्यंत सातत्याने फे-या मारतील , भाविकांना जोगापूर मंदिर परिसरात स्वंयपाक करण्यास बंदी राहील , सदरील जोगापूर यात्रा नियोजन संदर्भातील तसेच मानव वन्यजीव संघर्ष प्रतिबंधात्मक संरक्षणाच्या कामाकरीता लागणारा आवश्यक निधी वनविभागाचे स्तरावर करनार , नगर परिषद मार्फत जोगापूर मंदिर परिसरात भाविकांना पिण्याच्या पाण्याची सोय तसेच बोरवेल दुरस्ती करणेबाबत निर्णय घेण्यात आला ,
वन्यप्राण्यांचा वावर असल्यामुळे मंदिर परिसरा व्यक्तीरीक्त जंगलात इतरत्र क्षेत्रात प्रवशे बंदी करण्यात आलेली आहे. तथापी कोणीही इतरत्र क्षेत्रात प्रवेश बंदी ठिकाणी गेल्यास व अनुचित घटना घडल्यास नागरीक स्वतः जबाबदार राहणार , पोलीस विभागाकडून नियमित रीत्या पोलीस बंदोबस्त राहील. व दर्शनाची वेळ संपतांच जोगापूर मंदिर परिसर खाली करण्याबाबत सुचना देण्यात येतील , वैद्यकीय अधिक्षक उपजिल्हा रुग्णालय मुल यांचे कडून जोगापूर यांत्रेकरीता भाविकासाठी नियमितरीत्या अॅम्बूलंसह एक मेडीकल कॅम्प राहणार. जोगापूर मंदिराकडे जाणा-या 8 रस्त्यावर भाविकांची नोंदी घेण्याकरीता, तसेच मंदिर परीसरात व वनामधील रस्त्यावर देखरेख व गस्ती करीता अतिरीक्त मनुष्यबळ असेल, प्रशासनिक अधिकारी व कर्मचारी यांची निर्णय समिती तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला , पहिल्या दिवशी जोगापूर यात्रे निमित्याने जोगापूर गेट राजुरा येथे सुभाषभाऊ धोटे, आमदार विधानसभा क्षेत्र राजुरा यांनी जोगापूर यात्रेचा शुभांरभ केला व जंगल परिसरातील जागृत हनुमान मंदिर देवस्थानात पुजा व आरती करून

भाविकांना संबोधून यात्रेच्या शुभेच्छा दिल्या. जोगापूर वनक्षेत्रामध्ये व वनालगतच्या परिसरात वाघ, बिबट, अस्वल वन्यप्राण्यांचे अस्तित्व असल्याने भाविकांनी दक्षता घ्यावी, सदर क्षेत्रात वन्यप्राण्यांचे वस्तीस्थान असल्याने वन्यप्राण्यांना धोका होवू नये यासाठी प्लास्टीक वापरू नये, सदर परिसरात कचरा किंवा अन्न फेकू नये, वनक्षेत्रात आग लावू नये, तसेच वनविभागाने लावलेल्या नियमांचे पालन करून भाविकांनी यात्रेचा आंनद घ्यावा. अशा प्रकारचे आव्हानही केले.

सदर कार्यक्रमास सुभाषभाऊ धोटे, आमदार विधानसभा क्षेत्र राजुरा, रंजन लांडे तालुका अध्यक्ष, भारतीय काँग्रेस पार्टी राजुरा , अरून धोटे माजी नगराध्यक्ष राजुरा, एस. आर. लंगडे, उपविभागीय वन अधिकारी राजुरा अतिरीक्त कार्यभार, ओमप्रकाश गोंड, तहसिलदार , हेमंत भिंगारदेवे गट विकास अधिकारी , डॉ. सुरज जाधव मुख्याधिकारी नगर परिषद , धमेंद्र जोशी, सहाय्यक पोलीस निरीक्षक , ए. आर मडावी पोलीस उपनिरीक्षक विरूर स्टे., शुभांगी लाडसे बाहतुक निरीक्षक , बादल बेले अध्यक्ष म.रा. NEPHDO पर्यावरण संस्था, श्री. संदिप शांतीलाल जैन व्यापारी अध्यक्ष, डॉ. आर. आर. खेरानी उपप्राचार्य शिवाजी महाविद्यालय राजुरा, विजय दाळ सार्वजनिक बांधकाम उपविभाग राजुरा, एस. डी. येलकेवाड वनपरिक्षेत्र अधीकारी राजुरा, वि. वा. नरखेडकर, वपअ स. व. अ. नि. राजुरा , इतर प्रशासनिक अधिकारी व प्रतिनिधी, साईनाथ बदमकवार, सतीष धोटे, सुनिल देशपांडे, प्रतिष्ठित नागरीक व पत्रकार आणि सर्व वनकर्मचारी उपस्थित होते.

Jaypal Gedam

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

error: Content is protected !!