चंद्रपूर ( मुक्तीवाद सेवा ) : दिनांक 27/9/2025 रोजी सर्वोदय शिक्षण मंडळ अंतर्गत शांताराम पोटदुखे विधी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना यांच्या वतिने दिनांक 17 सप्टेंबर ते २ ऑक्टोबर 2025 पंधरवाडा कार्यक्रम संपन्न करण्यात आला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एजाज शेख सर यांनी आजची पिढी नशा मुळे कशाप्रकारे विकृत होत चाललेली आहे आणि समाज व्यवस्थेवर किती गंभीर परिणाम यामुळे झालेले आहेत, आणि येणारी पिढी कशी वाचवता येईल? यासाठी आणि या वाईट नशा प्रकारचे प्रवृत्ती पासून आपण कसे दुर रहावे हे विद्यार्थ्यांना कळावे म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे आदेश प्राचार्य एजाज शेख सर यांनी दिले.या विशेष मार्गदर्शनपर कार्यक्रमात नशा मुक्ती या विषयावर मार्गदर्शन करण्याकरिता ऍडव्होकेट फरात बेग सर यांना निमंत्रित केले होते. या कार्यक्रमात प्रामुख्याने मंचवर राष्ट्रीय सेवा योजनेचे माजी प्रमुख डॉक्टर सरोज कुमार दत्ता सर, एडवोकेट फराद बेग सर, डॉक्टर लीना लंगडे मॅडम, आणि राष्ट्रीय सेवा योजना चे प्रमुख नंदकिशोर भंडारी उपस्थित होते.
या नशा मुक्ती कार्यक्रमात आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉक्टर सरोज कुमार दत्ता सर म्हणाले की नशा मुळे कितीतरी आयुष्य उध्वस्त झाले आहे, आणि एक नशा करणाऱ्या व्यक्तीमुळे संपूर्ण कुटुंब उध्वस्त होते आणि त्याची वाईट परिणाम येणाऱ्या पिढीवर सुद्धा घडते, असे त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांना सांगितले. एडवोकेट फरात बेग यांनी अल्कोहोल मुळे होणारे नुकसान सोबतच इतर ड्रग्स मुळे शारीरिक आणि मानसिक नुकसान होते असे सांगितले आणि त्याबरोबरच जे करायचे नाही ते सुद्धा नशा केलेला व्यक्ती करू शकतो,आणि आपल्या आपल्या कुटुंबाचे नाव खराब करतो असे सांगितले, सोबतच त्यांनी एक नवीन प्रकारच्या मोबाईलचा नशा याबद्दल बोलताना म्हणाले की नवीन पिढी हे मोबाईल मुळे मोबाईलच्या अतिरेक केल्यामुळे एक वेगळ्या प्रकारच्या नशा अनुभवत आहे आणि त्यांनी मोबाईलचा वापर कमी करण्यास सांगितलं. जर आपण नवीन पिढीला मोबाईल बद्दल आणि त्याचे दुष्परिणाम जर सांगण्याचा प्रयत्न केला तर ही पिढी दुश्मन समजतात आणि रागविणे आणि किंचाळणे अशा प्रकारचे मानसिक रोगी बनत आहे. स्क्रोलिंग मोबाईलचे रिल्स बघण्यामध्ये तरुण पिढी आपला महत्त्वाचा वेळ कसा हरवीत चालले आहे हे त्यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणामध्ये व्यक्त केले, आणि संपूर्ण विद्यार्थ्यांना नो ड्रग्स नो मोबाईल असा संदेश त्यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.ख़ुशी शर्मा आणि आभार प्रदर्शन कु वैष्णवी ह्यांनी व्यक्त केले.
शांताराम पोटदुखे विधी महाविद्यालयात नशा मुक्ती उपक्रम साजरा.
संपादक
जयपाल गेडाम


