चंद्रपूर ( मुक्तिवाद सेवा ) : मानव व वन्यजीव संघर्ष टाळण्याकरिता शासनाने अनेक उपाययोजना निर्माण केले असून बफर , कोअर व काही प्रमाणात प्रादेशिकचे सुद्धा वनपरिक्षेत्र अधिकारी , वनपाल तसेच वनरक्षक दिवस रात्र अथक मेहनत घेऊन नागरिकांच्या हिताचे कार्य करताना आढळतात. खरोखरच अभिनंदनीय व कौतुकास्पद बाब आहे यात अजिबात शंका नाही.
मात्र प्राप्त झालेल्या माहिती नुसार मध्य चांदा वन विभागा अंतर्गत येत असलेल्या धाबा वनपरिक्षेत्राचे वनपरिक्षेत्र अधिकारी आपले मुख्यालय सोडून चंद्रपुरातून धाबा कार्यालयात ये – जा करीत असल्याने त्यांच्या अधिनस्त असलेल्या कर्मचाऱ्यांवर अजिबात नियंत्रण दिसत नाही. ही बाब वनविभागासाठी आत्मचिंतन करण्याची आहे. स्वतः वनपरिक्षेत्र अधिकारीच जर अंशी किलोमीटर दूरवरून येणे जाणे करत असतील तर स्वाभाविकच आहे क्षेत्र सहाय्यक व वनरक्षक कसे काय ? मुख्यालयाला राहणार. त्यामुळे रानटी प्राण्यांचा मोठ्या प्रमाणात हैदोस निर्माण झालेला असून कोणत्याही प्रकारची उपाययोजना नागरिकांच्या हिताची वाटत नाही. कारण अंशी किलोमीटर अंतरावरून प्रवास करून कार्यालयात गेल्यावर प्रत्यक्ष जंगलात जाऊन गस्त करणे किंवा वन्यप्राण्याबाबतचे जनजागृती करण्याची मानसिकताच राहत नसल्याने फक्त चार भिंतीच्या पंख्याची हवा खात , कागदी घोडे नाचवून पैसा कमावण्यातच संपूर्ण वेळ जात असते. आणि त्यानंतर पुन्हा घरचा रस्ता धरल्या जाते. मग अशा प्रकारच्या वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याच्या बेजबाबदारपणामुळे नागरिकांवर वन्यप्राण्यांचे हल्ले होणार नाही का ? याकरिता संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घेणे फार गरजेचे आहे. प्रत्येक कर्मचारी आपल्या मुख्यालयाला राहावे.हा फक्त कायदा आहे. त्या कायद्याला केराच्या टोपलीत टाकून व वरिष्ठांशी हात मिळवणी करून सदरच्या कायद्याचे सर्रास उल्लंघन केल्या जाते. हे कितपत योग्य आहे ? त्यामुळे जसे अधिकारी वागतात तसेच क्षेत्र सहाय्यक व वनरक्षक सुद्धा मुख्यालय सोडून कधी राजुरा तर कधी चंद्रपूर तर कधी गडचिरोली जिल्ह्यातून येणे जाणे करीत असल्याने नागरिकांच्या जीवितास मोठ्या प्रमाणात धोका निर्माण झाला आहे. क्षेत्र सहाय्यक व वनरक्षक फक्त सरपन गोळा करणारे शेतकऱ्यांना लागणारे छोटे मोठे लाकूड फाटे नेत असताना त्याना अडवून वसुली करण्यात , पीक नुकसानीच्या प्रकरणात लाभार्थ्यांना अधिकची रक्कम मिळवून देण्याच्या नावाखाली आर्थिक पिळवणूक करतात ही वस्तुस्थिती आहे. आणि त्यावर नियंत्रण कोणाचेच नाही.त्यामुळे सदर परिसरातील नागरिकात भीतीचे व असंतोषाचे सुद्धा वातावरण निर्माण झाल्याचे दिसते . कायद्याप्रमाणे मोठ्या प्रमाणात सरकार निधी देत असतो. मात्र त्या निधीचा सदुपयोग होण्याऐवजी दुरुपयोगच मोठ्या प्रमाणात होतो. हे जरी कटू असलं. तरी सत्य आहे.
वास्तविक पाहता सध्या धाबा येथे कार्यरत असलेले वनपरिक्षेत्र अधिकारी सिरोंच्या वन विभागात कार्यरत होते. तिथेही त्यांचा प्रशासन फारसा चांगला नव्हताच. त्यानंतर ते बल्लारशाला वाहतूक व विपणन विभागात कार्यरत होते. तिथे सुद्धा मिळेल तेवढी मलाइ चाखण्यातच कार्यकाळ गेला. आणि आता पुण्याला लुटून साताऱ्याला दान करून पुन्हा आपल्या पसंतीच्या ठिकाणी रुजू झाले. आणि इतकेच नाही तर पोम्भुर्नाचा अतिरिक्त कार्यभार सुद्धा देण्यात आला. त्यामुळे पुन्हा निमित्य मिळाला की वेळच मिळत नाही. लोक मरतात तर मी काय करू ?
याकरिता सदर बाबीला आता नव्याने रुजू झालेले मुख्य वनसंरक्षक तसेच उपवनसंरक्षक यांनी गंभीरतेने दखल घेऊन या बेजबाबदार महाशयांना त्यांची जागा दाखवून , परिक्षेत्रतील नागरिकांच्या भावना समजून. योग्य अधिकाऱ्याचे नियुक्ती करावी. अन्यथा येणाऱ्या काळात भाऊजी पाल सारख्या ५४ वर्षीय तरुण शेतकऱ्याला ज्याप्रमाणे जीव गमवावा लागला. तसाच प्रकार पुन्हा घडल्या शिवाय राहणार नाही.
वनपरिक्षेत्र अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळेच तरुण शेतकऱ्याचा बळी – नागरिक.
संपादक
जयपाल गेडाम


