Friday, October 24, 2025
Homeआपला जिल्हावन्यजीव सप्ताह निमित्त चिचपल्ली वनपरिक्षेत्रात कौतुकास्पद कार्य.

वन्यजीव सप्ताह निमित्त चिचपल्ली वनपरिक्षेत्रात कौतुकास्पद कार्य.

चंद्रपूर ( मुक्तिवाद सेवा ) : दिनांक ७/१०/२५ रोजी वनपरिक्षेत्र अधिकारी चिचपल्ली यांच्या मार्गदर्शनाखाली वन्यजीव सप्ताह निमित्त चिचपल्ली वन परिक्षेत्रातील संपूर्ण वनकर्मचारी व वनमजूर मिळून बाईक रॅली चिचपल्ली परिक्षेत्रातील गावांमध्ये वन्य प्राण्याविषयी व वृक्ष संवर्धनाविषयी जनजागृती रॅली काढण्यात आली. व रॅलीचे समारोप कर्मवीर महाविद्यालय मुल येथे करून महाविद्यालयाच्या सभागृहामध्ये नामशेष होत चाललेल्या वन्यजीवांचे संरक्षण व संवर्धन करून होणाऱ्या हवामाना बदल व मानवी आरोग्यावर होणाऱ्या परिणामावर मार्गदर्शन करण्यात आले. अंधश्रद्धा निर्मूलनावर कार्यक्रम घेण्यात आले. सदर कार्यक्रमाला वाळके मॅडम प्राचार्य कर्मवीर महाविद्यालय मुल व इतर शिक्षक वृंद कुंदोजवार अंधश्रद्धा निर्मूलन अध्यक्ष राजुरा , संजीवन पर्यावरण संरक्षण समिती मुलचे अध्यक्ष उमेशभाऊ झिरे इतर सदस्य चिचपल्ली , वनपरिक्षेत्र अधिकारी महेशकर , परिविक्षाधिन वन परिक्षेत्र अधिकारी गायकवाड चिचपल्ली परिक्षेत्रातील , वन कर्मचारी व वन मजूर आणि कर्मवीर महाविद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते.सर्व कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेत वन्यजीव सप्ताहाची सांगता केले.

Jaypal Gedam

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

error: Content is protected !!