Friday, October 24, 2025
Homeआपला जिल्हासावली वनपरिक्षेत्रात विविध उपक्रमाने वन्यजीव सप्ताह साजरा.

सावली वनपरिक्षेत्रात विविध उपक्रमाने वन्यजीव सप्ताह साजरा.

चंद्रपूर ( मुक्तिवाद सेवा ) : दरवर्षी प्रमाणे याही वर्षी दिनांक १ ऑक्टोबर ते ७ ऑक्टोबर दरम्यान सावली वनपरिक्षेत्रात वन्यजीव सप्ताह साजरा करण्यात आला. वन्यजीवाचे पर्यावरणातील व मानवी जीवनातील महत्त्व सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचे दृष्टिकोनातून वन व वन्य प्राण्यांचे संरक्षण आणि संवर्धनाकरिता तळागाळातील सर्वसामान्य नागरिकांना जास्तीत जास्त सहभागी करून घेण्यासाठी सावली वनपरिक्षेत्रातील उपवनक्षेत्र सावली, व्याहाड, राजोली, पाथरी, पेंढरी मध्ये विविध शाळेत रॅली काढून शाळेतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन कार्यक्रम तसेच सामान्य ज्ञान स्पर्धा, निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. गावागावात कलापथक टीमद्वारे जनजागृतीपर कार्यक्रम, जंगलात नैसर्गिक पुनर्निर्मिती कामे, वनराई बंधारे आणि गावागावात सार्वजनिक ठिकाणी वन्यप्राण्यांचे महत्व पटवून देणारे पोस्टर्स भित्तीपत्रके लावून वेगवेगळ्या प्रकारचे नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आले. वन्य प्राण्यांचे पर्यावरणातील महत्त्व लक्षात घेऊन वन्य प्राण्यांच्या संरक्षणासोबतच मानव वन्यजीव संघर्ष कमी करण्याकरिता जनतेनी सहकार्य करण्याचे आवाहन वनपरिक्षेत्र अधिकारी विनोद धुर्वे यांनी केले आहे.

Jaypal Gedam

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

error: Content is protected !!