चंद्रपूर ( मुक्तिवाद सेवा ) : 2 ऑक्टोबर 2025
ताडोबा – अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या सर्व वनपरिक्षेत्र कार्यालयांमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंती अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त ताडोबा व सभोवतालच्या परिसरात विशेष स्मृच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत वनविभागाचे अधिकारी, वनरक्षक व इतर कर्मचारी, जिप्सी चालक, मार्गदर्शक, ईडीसी सदस्य व स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येनेसहभागी झाले होते.
महात्मा गांधी यांच्या साधेपणा व सेवाभाव या मूल्यांची जोपासना करत मोहर्ली, कोळसा, खडसंगी, शिवणी, कारवा, चोडमपल्ली यांसह विविध कार्यालयांचा परिसर स्वच्छ करण्यात आला. तसेच आगरझरीचे फुलपाखरु उद्यान, जुनोना, नवेगाव, अलिझंजा, सिरकाडा, पांगडी, झरी या निसर्ग पर्यटन प्रवेशद्वाराच्या परिसरातील कचराही गोळा करण्मात आला. मोहर्ली, शिवणी, नलेश्वर, चकबामणी येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांची प्रभातफेरीकाढून स्वच्छतेचे महत्व विषद करण्यात आले.
याशिवाय मुधोली, शिवणी व अन्झत्र मानव-वन्द्यजीव संघर्षांबाबत स्थानिक ग्रामस्थांमध्ये जनजागृती करण्यात आली. आगरझरी येथे श्रमदानातून वनराई बंधारा बांधण्यात आला. निमढेला येथे जिप्सी चालक मालक व मार्गदर्शक यांच्या श्रमदानातून पर्यटन रस्ता दुरुस्त करण्यात आला. कळमगाव, तुकूम, मोहाळी येथे ग्रामस्थांना धूरविरहित चुलींचे वाटप करण्यात आले.
या उपक्रमांमधून वन्य जीव संवर्धन स्वच्छता आणि शाश्वततेसाठी सामूहिक जबाबदारीचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.
गांधी जयंती निमित्त ताडोबामध्ये स्वच्छता मोहिम.
संपादक
जयपाल गेडाम


