चंद्रपुर ( मुक्तिवाद सेवा ) : प्रतिभाताई धानोरकर खासदार चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ यांच्याशी दिनांक ०१ ऑक्टोबर २०२५ रोजी मोहर्ली येथील वन पर्यटन प्रवेशद्वार येथे झालेल्या चर्चेच्या अनुषंगाने स्थानिक नागरिकांच्या हितासाठी प्रायोगिक तत्त्वावर आठवड्यातून एक दिवस एका बफर गेटवर एका सत्रासाठी काही जिप्सी राखीव ठेवण्यासंदर्भातील प्रस्ताव कार्यकारी समितीकडे मंजुरीस्तव पाठविण्यात आला होता.
सदर प्रस्तावावर दिनांक ०३ ऑक्टोबर २०२५ रोजी झालेल्या कार्यकारी समितीच्या बैठकीत सविस्तर चर्चा होऊन बफर विभागातील आगरझरी गेट येथे दर बुधवारी सकाळच्या सत्रासाठी सर्व सहा जिप्सी सफारी केवळ चंद्रपूर जिल्ह्यातील स्थानिक नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात येतील. तसेच यामध्ये एका ६ सीटर जिप्सी करिता ५००० रुपये एवढे शुल्क आकारले जाईल असा निर्णय कार्यकारी समितीद्वारे घेण्यात आलेला आहे. सदरील जिप्सी बुकिंग हे उपसंचालक (कोर) ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प ,चंद्रपूर कार्यालयातील क्रुझर बुकिंग काउंटर येथेच सफारीच्या ७ दिवस आधीपासून एकदिवस आधीपर्यंत सकाळी ११:०० ते सायंकाळी ०५:०० वाजेपर्यंत करू शकनार.
हा उपक्रम प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात येणार असून प्रतिसाद अनुसार पुढील निर्णय घेतील. याची अंमलबजावणी बुधवार दिनांक ०८ ऑक्टोबर २०२५ पासून करण्यात येईल.
सद्यस्थितीत ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाकडून स्थानिकांच्या सोईसाठी ९ सिटर क्रुझर सुरु असुन मोहरली प्रवेशव्दाराकरीता ४ क्रुझर व कोलारा प्रवेशव्दाराकरीता ३ क्रुझर कार्यरत आहेत. तसेच प्रती दिवस १४ क्रुझरव्दारे सकाळ व दुपार फेरीकरीता एकुण १२६ पर्यटकांना प्रवेश देता येतो. क्रुझर सफारी सेवा शुल्क केवळ रु. ७२०/- एवढे असुन त्यात कॅमेरा शुल्कामध्ये १०० टक्के सुट देण्यात आलेली आहे. अशी माहिती कोरचे उपसंचालक आनंद
रेड्डी येल्लू यांनी दिले आहे


