चंद्रपूर ( मुक्तीवाद सेवा ) : जिल्हा पुर्नवसन कार्यालय प्रशासकीय भवन चंद्रपूर येथील सहायक महसुल अधिकारी नरेंद्र विठोबाजी खांडेकर यांनी ३०,०००/- रूपये लाच रक्कम मागणी करून स्विकारल्याने अँटी करप्शन ब्युरो चंद्रपूर यांचे पथकाने आज दि. २८/०९/२०२५ रोजी कार्यवाही केली.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, तक्रारदार हे चंद्रपूर येथील रहिवासी असून त्यांच्या आईची मौजा चारगांव ता. भद्रावती, जि. चंद्रपूर येथील घर व खुली जागा औष्णीक विद्युत केंद्र चंद्रपूरच्या प्रकल्पात गेलेली असल्याने सदर मालमत्तेवर तक्रारदार यांचे मुलीचे नांव प्रकल्पग्रस्त व्यक्ती म्हणुन नामनिर्देशीत केले होते. महाराष्ट्र राज्य वीज निर्मीती कंपनी मर्यादित मुंबई यांचेकडून घेण्यात आलेल्या परिक्षेमध्ये तक्रारदार यांची मुलगी ही प्रकल्पग्रस्त या राखीव जागेतून ‘कनिष्ठ अभियंता’ या पदाकरीता निवड झालेली होती. तक्रारदार यांचे मुलीचे प्रकल्पग्रस्त या राखीव जागेतून निवड झालेली असल्याने प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्राची पुर्नपडताळणी करण्याकरीता जुलै २०२५ मध्ये जिल्हा पुर्नवसन कार्यालय चंद्रपूर येथे पत्र प्राप्त झाले होते. त्यानुसार तक्रारदार हे त्यांच्या मुलीसह प्रशासकीय भवन चंद्रपूर येथील जिल्हा पुर्नवसन कार्यालय येथील सहायक महसुल अधिकारी नरेंद्र विठोबाजी खांडेकर यांना भेटले असता तक्रारदार यांना त्यांच्या मुलीच्या नोकरीकरीता प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्राची पुर्नपडताळणी करून अहवाल महाराष्ट्र राज्य वीज निर्मीती कंपनी मर्यादित मुंबई यांना पाठविण्याकरीता २ लाख रूपये लाचेची मागणी करून तडजोडी अंती सध्या १ लाख रूपये व अहवाल तयार झाल्यानंतर ३० हजार रूपये पैशाची मागणी केली होती. त्यानुसार तक्रारदार यांनी १ लाख रूपये जुलै २०२५ मध्ये दिलेले होते.
त्यानंतर दिनांक २६/०९/२०२५ रोजी तक्रारदार यांनी खांडेकर यांना फोन करून मुलीच्या प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्राचे पुर्नपडताळणी अहवाल पाठविले किंवा कसे ? याबाबत विचारणा केली असता खांडेकर यांनी तक्रारदार यांना कार्यालयात बोलावून उर्वरीत ३०,०००/- रू. घेवून या अन्यथा अहवाल पाठविणार नाही असे म्हणाले. परंतु तक्रारदार यांना सहायक महसुल अधिकारी नरेंद्र विठोबाजी खांडेकर यांना लाच रक्कम देण्याची ईच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, चंद्रपूर येथील अधिकाऱ्यांना भेटुन आज दिनांक २८/०९/२०२५ रोजी तक्रार दिली. तक्रारदार यांचे तक्रारीवरून आज दि. २८/०९/२०२५ रोजी सहायक महसुल अधिकारी नरेंद्र विठोबाजी खांडेकर यांची पंचासमक्ष पडताळणी केली असता त्यांनी स्वतः करीता ३०,०००/-रूपये लाच रक्कमेची मागणी करून स्विकारण्याची तयारी दर्शविली. त्यावरून आज दि. २८/०३/२०२५ रोजी सापळा कार्यवाही दरम्यान आरोपी लोक सेवक सहायक महसुल अधिकारी नरेंद्र विठोबाजी खांडेकर यांना प्रशासकीय भवन चंद्रपूर येथील उपजिल्हाधिकारी पुर्नवसन कार्यालय चंद्रपूर येथील कार्यालयात ३०,०००/- रूपये लाच रक्कम स्विकारल्याने त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.तसेच पुढील तपासकार्य सुरू आहे.
सदरची कार्यवाही दरम्यान सागर कवडे पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतीबंध विभाग नागपूर, श्रीमती माधुरी बावीस्कर अपर पोलीस अधीक्षक नागपूर यांचे मार्गदर्शनात पोलीस उपअधीक्षक श्रीमती मंजुषा भोसले, पोलिस हवालदार हिवराज नेवारे, विजेंद्र वाढई, पोलिस शिपाई अमोल सिडाम, राकेश जांभुळकर, प्रदिप ताडाम, राजेंद्र चौधरी, सचिन गजभिये, महेश माहुरपवार, मेघा मोहुर्ले, पुष्पा काचोळे, सतिश सिडाम सर्व लाचलुचपत प्रतिबंधक विभाग चंद्रपूर व संदीप कौरोसे चंद्रपूर यांनी यशस्वीरीत्या जबाबदारी पार पाडली आहे.तसेच हॅश व्हॅल्यु घेण्यात आलेली आहे.
त्याचप्रमाणे सर्व नागरीकांना आवाहन केले आहे की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी अथवा कर्मचारी यांनी किंवा त्यांच्यावतीने खाजगी इसम एजेंट यांनी कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ संपर्क साधण्याकरिता
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, कार्यालय नागपूर
सागर कवडे पोलीस अधीक्षक नागपूर येथील
०७१२-२५६१५२० या दुरध्वनी क्रमांकावर ,
श्रीमती माधुरी बावीरकर अपर पोलीस अधीक्षक नागपूर , लाचलुचपत प्रतिबंधक विभाग चंद्रपूर कार्यालयीन दुरध्वनी क्रमांक ०७१७२ – २५०२५१
श्रीमती मंजुषा भोसले पोलीस उपअधीक्षक ,
निलेश उरकुडे पोलीस निरीक्षक चंद्रपूर ,
सचिन धर्मेजवार पोलीस निरीक्षक चंद्रपूर ,
टोल फ्रि क्रमांक १०६४ , ९३२२२५३३७२, ८४५९८४८५५६ , ९६२३०५५६५५ या क्रमांकावर अथवा Email: acbchandrapur@gmail.com Website: www.acbmaharashtra.gov.in येथे संपर्क करण्यास कळविले आहे.


